Advertisement

राजा भाईंचं माझ्या करियरमध्ये मोठं योगदान - सचिन तेंडुलकर


राजा भाईंचं माझ्या करियरमध्ये मोठं योगदान - सचिन तेंडुलकर
SHARES

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने शुक्रवारी आपल्या क्रिकेट कारकिर्दीत बीसीसीआयचे माजी अध्यक्ष राजसिंह डुंगरपूर यांनी दिलेल्या योगदानाला उजाळा दिला.

डुंगरपूर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (सीसीआय)च्या प्रवेशद्वाराला त्यांचे नाव देण्यात आले आहे. या प्रवेशद्वाराचे उद्घाटन सचिनच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी सचिन म्हणाला, 'सीसीआय'मध्ये यायला मला खूप चांगले वाटते. जेव्हा राजाभाई यांचा विषय येतो, तेव्हा मलाच समजत नाही काय बोलू? सुरूवात कुठून करू? आमचे नाते असेच होते. त्यांनी प्रत्येक वेळी मला मार्गदर्शन केले.

राजाभाई यांनी मला जेव्हा पहिल्यांदा पाहिले होते, तेव्हा मी १३-१४ वर्षांचा असेल. मी 'सीसीआय'च्या विरोधात धावा केल्या होत्या. मी 'शिवाजी पार्क यंग स्टार'कडून खेळत होतो. त्यावेळी माधव आपटे 'सीसीआय'कडून किपींग करत होते. त्यांच्या विरोधात खेळणे म्हणजे सन्मानाची गोष्ट होती.

राज भाई यांनी माझा खेळ पाहून 'सीसीआय'कडून खेळण्यासाठी सांगितले. मला ड्रेसिंग रुममध्ये जाण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी सर्व नियम धाब्यावर बसवले होते, असेही सचिन म्हणाला.

डुंगरपूर २००४-०५ मध्ये पाकिस्तानच्या दौऱ्यासाठी भारतीय संघाच्या मॅनेजर होते. राजाभाई तरुणांना खूप मदत करायचे, मी नशीबवान होतो की त्यांनी माझी खूप मदत केली. परदेशात जाण्याच्या वेळेस जेव्हा माझ्यासारख्या कुठल्याही तरूणाकडे पैसे नसायचे तेव्हा ते त्याला प्रायोजक मिळवून देत परदेशी जाण्यासाठी मदत करायचे.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा