Advertisement

... तर अशी घडली क्रिकेटर पूनम राऊत


SHARES

क्रिकेट या खेळाकडे फक्त पुरुषांचाच खेळ म्हणून पाहिले जायचे. महिलांना क्रिकेट हा खेळ खेळण्याचा समान हक्क आहे, ही कल्पनाच या संपूर्ण व्यवस्थेला मान्य नव्हती. पण आता परिस्थिती बदलली आहे. इंग्लंडमधील विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने केलेल्या कामगिरीनंतर महिला क्रिकेटची एक संपूर्ण पिढीच प्रकाश झोतात आली. या कामगिरीत भारतीय संघाची फलंदाज पूनम राऊतचा देखील मोलाचा वाटा आहे. पूनम राऊतच्या संथ फलंदाजीचा आणि बचाव तंत्राचा भारतीय संघाला फायदा झाला. महिला संघाने विश्वचषक जिंकला नसला तरी भारतीयांची मने नक्कीच जिंकली. सर्वच महिला खेळाडूंसोबत पूनम राऊतचे देखील कौतुक झाले


लहानपणापासून क्रिकेटर व्हायचे पूनम राऊतचे स्वप्न होते. पूनमने आपल्या फलंदाजीचे धडे गिरवले ते मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरकडून मात्र, टीव्हीवर पाहून. लहान असताना गल्ली क्रिकेट खेळायची. पूनमकडे क्रिकेटची बॅट नव्हती. त्यामुळे कपडे धुण्याच्या धोक्याने सुरुवातीला पूनम क्रिकेट खेळायची. तेव्हापासून तिच्या मनात क्रिकेटमध्ये करिअर करण्याची इच्छा निर्माण झाली


सौजन्य


कशी घडली क्रिकेटर पूनम राऊत?

बोरिवलीला राहायला गेल्यावर आपल्या भावासोबत पूनम क्रिकेट खेळायची. गल्लीतल्या मुलांसोबतच तीन-चार ओव्हर खेळायची. हळूहळू क्रिकेटमध्ये आवड निर्माण झाली. त्यामुळे समर कँपमधून पूनमने क्रिकेटचे धडे गिरवले. त्यानंतर शिवसेवा अकादमीमत पूनमने खेळायला सुरुवात गेली. तिकडे फक्त मुले खेळायची. त्यामुळे पाच वर्षे पूनम मुलांसोबतच क्रिकेट खेळली. पूनम राऊतचे प्रशिक्षक संजय गायतोंडे यांनी पूनमचे अॅडमिशन माटुंग्यातल्या महिला अकादमीत केले. त्यानंतर पूनमने मुलींसोबच सराव करायला सुरुवात केली. तिकडूनच पूनमने आपल्या करिअरमध्ये खऱ्या अर्थाने चौके आणि छक्के मारायला सुरुवात केली.


पूनमने क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली तेव्हा एनेकांच्या भुवया उंचावल्या. मुलगी क्रिकेट खेळणार? मुली क्रिकेट कुठे खेळतात?असे अनेक शंका उपस्थित करण्यात आल्यामात्र,पूनमने त्याकडे दुर्लक्ष केलेपूनमचे वडिल गणेश राऊत यांची आर्थिक परिस्थितीमुळे क्रिकेटपटू बनण्याची इच्छा पूर्ण झाली नाही. पण पूनमला खेळताना पाहून गणेश यांना त्यांचे दिवस आठवतातज्या पद्धतीने ते खेळायचे तसाच खेळ पूनम खेळते. त्यामुळे माझे स्वप्न पूनम करत आहेत,असा आनंद गणेश राऊत यांनी व्यक्त केला.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा