स्टेशनरी नसल्यामुळे वीज बिल उशिरा

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

बेस्टच्या लाखो वीजग्राहकांना मागील महिन्याचं वीज बिल अजूनही मिळालं नसल्याची माहिती समोर येत आहे. वीज बिले न आल्यानं स्टेशनरी नसल्याची तक्रार करण्यात येत आहे. शहरातील २० टक्के ग्राहकांना सप्टेंबर महिन्याचं वीज बिलंच मिळाली नसल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी मंगळवारी झालेल्या बेस्ट समितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा याला कारणीभूत असल्याचा आरोप करण्यात आला.

अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा

वीज बिलं छापण्यासाठी निविदा मागवून प्रिंटरची नेमणूक केली जाते. मात्र, या प्रक्रियेत स्टेशनरी नसल्यानं बेस्टच्या ग्राहकांना मागील महिन्याचं वीज बिल मिळाली नाहीत. या विषयावर मंगळवारी बेस्टच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यावेळी मुंबई पालिकेचे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी देखील त्यांना दर महिन्याला ८ तारखेला येणारं वीज बील २२ तारीख उलटली तरी मिळालं नसल्याचं निदर्शनास आणून दिलं. त्यावेळी यासर्व प्रकाराला अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा कारणीभूत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

वीज बिलं लाखो ग्राहकांना वेळेत न मिळाल्यानं बेस्टचं आर्थिक नुकसान झालं आहे. १० दिवसांपर्यंत बिलांना विलंब झाल्याने मुदतपूर्व बिलं भरणाऱ्या ग्राहकांना या महिन्यातील वीजेचं बिल भरताना सवलत मिळणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.



हेही वाचा - 

राज्यावरील लोडशेडिंगचं संकट टळलं! महावितरणं खरेदी केली २००० मेगावॅट वीज

राज्यातील १८० तालुके दुष्काळसदृश; मुख्यमंत्र्यांची घोषणा

पुढील बातमी
इतर बातम्या