Advertisement

राज्यावरील लोडशेडिंगचं संकट टळलं! महावितरणं खरेदी केली २००० मेगावॅट वीज

राज्यावरील लोडशेडिंगचं संकट टळल्याची माहिती महावितरणचे मुख्य जनसंपर्क अधिकारी पी. एस. पाटील यांनी दिली आहे. महावितरणने बाजारातून २००० मेगावॅट वीज खरेदी केल्यानं गेल्या ५ दिवसांपासून सुरू असलेली लोडशेडिंग मागे घेण्यात आली आहे.

राज्यावरील लोडशेडिंगचं संकट टळलं! महावितरणं खरेदी केली २००० मेगावॅट वीज
SHARES

आॅक्टोबर हिटच्या तडाख्यामुळे मुंबई महानगर प्रदेशा (एमएमआर)सह राज्यभर विजेची मागणी वाढली आहे. पण कोळशाची टंचाई आणि इतर अडचणींमुळे वाढीव वीजनिर्मिती होत नसल्यानं गेल्या ५ दिवसांपासून 'एमएमआर'मधील काही भागांसह राज्यातील विविध भागांत भारनियमन (लोडशेडिंग) लागू करण्यात आलं होतं. यामुळे नवरात्रीसह दिवाळीही अंधारात जाण्याची भीती व्यक्त होत होती. पण राज्यावरील लोडशेडिंगचं संकट टळल्याची माहिती महावितरणचे मुख्य जनसंपर्क अधिकारी पी. एस. पाटील यांनी दिली आहे. महावितरणने बाजारातून २००० मेगावॅट वीज खरेदी केल्यानं गेल्या ५ दिवसांपासून सुरू असलेली लोडशेडिंग मागे घेण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.


कशामुळे मागणी वाढली?

राज्यात १७०० मेगावॅट विजेची गरज असताना आॅक्टोबर हिटमुळे वीजेची मागणी ३००० मेगावॅटनं वाढली. पण ही मागणी पूर्ण करत येत नसल्यानं अखेर महावितरणने ८ आॅक्टोबरपासून जी-१, जी-२ आणि जी-३ परिसरात लोडशेडिंग लागू केलं. त्यामुळे मुंब्र्यासह 'एमएमआर'मधील अनेक भागातील नागरिकांनाही लोडशेडिंगला सामोरं जावं लागलं. एेन नवरात्रोत्सवात लोडशेडिंग लागू झाल्यानं राज्य सरकारसह महावितरणावर मोठी टीका होत होती. याविरोधात आंदोलनाचीही हाक देण्यात आली होती.


१०० कोटींचा खर्च

या पार्श्वभूमीवर अखेर महावितरणने १०० कोटी खर्च करत बाजारातून चढ्या दरानं २००० मेगावॅट वीज खरेदी केली आहे. तर या एक-दोन दिवसांत वीजनिर्मितीही काही प्रमाणात वाढली आहे. त्यामुळं लोडशेडिंग मागं घेण्यात आल्याची माहिती पाटील यांनी दिली आहे. आता लवकरच हिवाळ्याचे दिवस सुरू होतील आणि वीजेची मागणी कमी होईल. त्यामुळे आता लोडशेडिंग लागू करण्याची काहीही गरज पडणार नसल्याचं म्हणत 'एमएमआर'सह राज्यभरातील नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे.



हेही वाचा-

एमएमआरमधील अनेक परिसरात लोडशेडिंग, मुंबईकरांना मात्र दिलासा

तांत्रिक बिघाडानं शहरातील बत्ती गुल



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा