Advertisement

तांत्रिक बिघाडानं शहरातील बत्तीगुल


तांत्रिक बिघाडानं शहरातील बत्तीगुल
SHARES

वीजपुरवठा खंडीत होणं वा ५ मिनिटांपेक्षा अधिक काळ वीज जाणं असा अनुभव सहसा मुंबईकरांना येत नाही. पण गेल्या दोन आठवड्यात मुंबईत एकदा नव्हे तर तीनदा वीज गेली. कळव्यातील सब स्टेशन बंद पडल्यानं मुंबईकरांनी वीज भारनियमनांचा अनुभव घेतला. तर त्यानंतर पावसात मुंबईतील अनेक भागातील बत्तीगुल झाली. तर आता मंगळवारी तिसऱ्यांदा मुंबईकरांनी बत्तीगुलचा अनुभव घेतला. दुपारी चार वाजून ५ मिनिटांनी टाटा वीज कंपनीच्या धारावी येथील संग्राही वीज केंद्रातील अर्थात सबस्टेशनमधील ११० के व्ही सबस्टेशनमध्ये बिघाड झाला नि मुंबई शहरातील वीज पुरवठा खंडीत झाला.


११ सबस्टेशनमधील वीज खंडीत

बेस्ट उपक्रमाच्या सायन फोर्ट, वडाळा, धारावी, माहिम, शितळादेवी, एलफिन्स्टन, प्रभादेवी, वरळी, पोचखानवाला, किंग्जवे रावळी हिल, व्ही. एस. एन. एल., नेस्ले सिम्प्लेक्स मिल आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर या सबस्टेशनला टाटा वीज कंपनीच्या धारावीतील ११० केव्ही सबस्टेशनमधून वीजपुरवठा केला जातो. दुपारी चार वाजून ५ मिनिटांनी टाटाच्या धारावीच्या सबस्टेशनमध्ये तांत्रिक बिघाड झाला नि बेस्ट उपक्रमाच्या वरील ११ सबस्टेशनमधील वीज पुरवठा खंडीत झाला. त्यामुळं या ११ सबस्टेशनच्या आसपासच्या परिसरातील अर्थात मुंबई शहरातील बत्तीगुल झाली आणि मुंबईकरांना एक ते दोन तास अंधारात रहावं लागलं.


तब्बल दोन तास अंधारात

वीजपुरवठा खंडीत झाल्यानं बेस्ट आणि टाटानं तात्काळ वीजपुरवठा पुर्ववत करण्याच्या हालचाली सुरू केल्या. त्यानुसार टाटानं माहिम काॅजवे इथल्या सबस्टेशनसह इतर सबस्टेशनमधून वीज घेत एकेका परिसरातील वीज पुरवठा पुर्ववत करण्याचा प्रयत्न केला. तब्बल दोन तासांनंतर अर्थात संध्याकाळी सात वाजता सर्वच ठिकाणचा वीजपुरवठा पूर्ववत झाल्याची माहिती बेस्टनं एका परिपत्रकाद्वारे दिली आहे. तर नागरिकांना, ग्राहकांना होणाऱ्या
गैरसोयीबद्दल दिलगिरीही व्यक्त केली आहे.



हेही वाचा -

१२ इंच पाण्यातही चालणार रेल्वे इंजिन

धारावीच्या पुनर्वसनासाठी दुबईतील उद्योजकांचा पुढाकार



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा