Advertisement

१२ इंच पाण्यातही चालणार रेल्वे इंजिन


१२ इंच पाण्यातही चालणार रेल्वे इंजिन
SHARES

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर आहे. मध्य रेल्वेनं लवकरच नवं वॉटरप्रूफ इंजिन चालू करण्याचा निर्णय घेतला आहे. हे इंजिन रेल्वे रुळावर भरलेल्या १२ इंचाच्या पाण्यातही चालू शकणार आहे.

पावसाळ्यात रेल्वे रुळांवर पाणी तुंबल्यामुळं रेल्वेचा वेग मंदावतो. परिणामी प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असतात. त्यामुळं यंदाच्या पावसाळ्यात प्रवाशांना याचा त्रास होऊ नये यासाठी मध्य रेल्वेने वॉटरप्रूफ इंजिन चालू करण्याचा निर्णय घेतला आहे.


तापमान नियंत्रीत इंजिन

सध्या कार्यरत असलेले वॉटरप्रूफ इंजीन हे केवळ ४ इंच पाण्यात चालण्याच्या क्षमतेचं आहे. ४ इंचापेक्षा जास्त पाणी झाल्यास हे पाणी इंजीनच्या खालून ट्रॅंक्शन मोटरमध्ये जातं. ज्यामुळं इंजिनमध्ये बिघाड निर्माण होतो, असं रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितलं. या इंजिनमध्ये एक खास प्रकारचे सेन्सर बसवण्यात आलं आहं. या सेन्सरमुळं मोटारच्या तापमानात नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे. या इंजिनची चाचणी पूर्ण झाली असून ते कुर्ला लोकोमोटीव्ह शेडमध्ये आहे.हेही वाचा -

धारावीच्या पुनर्वसनासाठी दुबईतील उद्योजकांचा पुढाकार

मुंबईकरांनो, घरापासून मेट्रो स्थानकापर्यंत पोहोचा सायकलनं! 

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा