Advertisement

मुंबईकरांनो, घरापासून मेट्रो स्थानकापर्यंत पोहोचा सायकलनं!

जागतिक पर्यावरण दिनाच्यानिमित्तानं 'एमएमआरडीए'नं पायाभूत सुविधांचा विकास करताना वाहनांमुळं होणारं प्रदूषण आणि वाहतूककोंडी टाळण्यासाठी सायकल चळवळ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रत्येक मेट्रो स्थानकाबाहेर सायकल स्टॅण्ड उभारण्यात येणार आहे.

मुंबईकरांनो, घरापासून मेट्रो स्थानकापर्यंत पोहोचा सायकलनं!
SHARES

घरापासून किंवा आॅफिसपासून मेट्रो स्थानकापर्यंत पोहचणं मुंबईकरांना सोपं व्हावं यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (एमएमआरडीए)नं प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच भाग म्हणून एमएमआरडीएनं शेअरिंग सायकलचा पर्याय पुढे आणला आहे. मेट्रो स्थानकाबाहेर शेअरिंग सायकल स्टॅण्डची सुविधा पुरवण्याचा निर्णय 'एमएमआरडीए'नं घेतल्याची माहिती महानगर आयुक्त आर. ए. राजीव यांनी दिली आहे.

जागतिक पर्यावरण दिनाच्यानिमित्तानं 'एमएमआरडीए'नं पायाभूत सुविधांचा विकास करताना वाहनांमुळं होणारं प्रदूषण आणि वाहतूककोंडी टाळण्यासाठी सायकल चळवळ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.


मुंबई व्हावं सायकलस्वारांचं शहर

डेन्मार्कमधील कोपनहोगन शहर हे सायकल स्वारांचं शहर म्हणून ओळखलं जातं. फिनलॅण्डमधील ६० टक्के, जपानमधील ५७ टक्के, बेल्जियम आणि स्विर्त्झलॅण्डमधील ४८ टक्के, चीनमधील ३७.२ टक्के लोकसंख्या कामावर जाण्या-येण्याकरता सायकलचा वापर करते. नेदरलॅण्ड, नाॅर्वे, स्वीडन, जर्मनी, डेन्मार्क, अमेरिका या देशांमध्ये सायकल चळवळ उभी राहिली आहे. या धर्तीवर मुंबईतही सायकल चळवळ उभी करत पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचं राजीव यांनी सांगितलं.


प्रत्येक स्थानकाबाहेर स्टॅण्ड

त्यासाठी मेट्रोच्या प्रत्येक स्थानकाबाहेर सायकल स्टॅण्ड उभारण्यात येणार आहे. सेल्फ-ड्रिव्हन-सायकल-कॅब या नावाखाली ही संकल्पना राबवण्यात येणार आहे. 'एमएमआरडीए'नं याआधीही सायकल चळवळ सुरू करत मुंबईकरांना सायकलची ओढ लावण्याचा प्रयत्न केला होता. त्यासाठी बीकेसीमध्ये काही कोटी खर्च करत स्वंतत्र सायकल ट्रॅक बांधला होता.


प्रकल्प 'असा' झाला फ्लाॅप

या सायकल ट्रॅकचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते थाटामाटात उद्घाटन करण्यात आलं. पण उद्धाटन झाल्यानंतर काही तासांतच सायकल ट्रॅकवर सायकलएेवजी बाईक पार्किंग दिसून आली. तर महत्वाचं म्हणजे एक दिवसही मुंबईकरांनी या सायकल ट्रॅकचा वापर केला नाही नि ही प्रकल्प फ्लाॅप गेला.


कोट्यवधीचा चुराडा

अखेर सायकल ट्रॅक उखडून काढण्याची नामुष्की 'एमएमआरडीए'वर आली. या प्रकल्पामुळं कोट्यवधींचा चुरडा झाल्यानं हा प्रकल्पही चांगलाच वादात सापडला होता. या प्रकल्पाचा खर्च 'एमएमआरडीए'च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पगारातून कापण्याची मागणीही राज्य सरकारकडं करण्यात आली होती. असं असताना आता पुन्हा 'एमएमआरडीए'नं सायकलचा घाट घातला आहे. तेव्हा यात तरी 'एमएमआरडीए'ला यश येतं का? हे आता येणाऱ्या काळातच समजेल.



हेही वाचा-

'मेट्रो कामामुळे होणारं ध्वनी प्रदूषण कमी करा', प्रधान सचिवांचे MMRC ला आदेश

'मुंबई तुंबणार नाही', एमएमआरडीए, मेट्रोची ग्वाही



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा