मेट्रो-३ चं २ किमीचं भुयार पूर्ण

एमएमआरसीनं मेट्रो-३ च्या कामाला वेग दिला असून या कामातील एक महत्त्वाचा टप्पा एमएमआरसीनं नुकताच पूर्ण केला आहे. तो म्हणजे ३३.५ किमी मेट्रो मार्गापैकी २ किमी भुयारी मार्गाचं काम पूर्ण करण्यात आलं आहे.

मेट्रो-३ चं २ किमीचं भुयार पूर्ण
SHARES

कुलाबा-वांद्रे-सीप्झ हा मुंबईतील पहिला भुयारी मेट्रो प्रकल्प २०२१ पर्यंत पूर्ण करण्याचं टार्गेट मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशन (एमएमआरसी)नं समांर ठेवलं आहे. हे टार्गेट पूर्ण करण्याच्यादृष्टीनं  एमएमआरसीनं मेट्रो-३ च्या कामाला वेग दिला असून या कामातील एक महत्त्वाचा टप्पा एमएमआरसीनं नुकताच पूर्ण केला आहे. तो म्हणजे ३३.५ किमी मेट्रो मार्गापैकी २ किमी भुयारी मार्गाचं काम पूर्ण करण्यात आलं आहे. अवघ्या ६ महिन्यांत हे काम पूर्ण केल्याचा दावा एमएमआरसीच्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांनी केला आहे.


आव्हानात्मक काम

मेट्रो-३ ही मुंबईतील पहिली भुयारी मेट्रो असल्यानं हा प्रकल्प महत्त्वाकांक्षी मानला जातो. मुंबईसारख्या दाटीवाटीच्या, २४ तास वर्दळ असणाऱ्या, जुन्या इमारती असलेल्या आणि भूमिगत वाहिन्या असलेल्या मुंबईत भुयारी मेट्रोचं काम करणं मोठं आव्हान होतं. हे आव्हान पेलत एमएमआरसीनं अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर भुयारी मार्ग तयार करण्यासाठी केला आहे. परदेशातून तब्बल १७ टनेल बोअरिंग मशिन्स अर्थात टीबीएम मशिन आणून या भुयारी मार्गाचं काम केलं जात आहे.सूर्या, वैतरणा मुंबईच्या पोटात

१७ टीबीएम मशिन मुंबईच्या पोटात शिरून भुयारी मार्ग तयार करत करत तब्बल २ वर्षांनंतर बाहेर येणार आहेत. १७ मशिनपैकी ११ मशिन मुंबईत दाखल झाल्या आहेत. आतापर्यंत ८ मशिन मुंबईच्या पोटात शिरल्या असून त्या भुयारी खोदकामाचं काम करत आहेत.

या मशिनला एमएमआरसीनं खास नावही दिली आहेत आणि तीही नद्यांची. सूर्या, वैतरणा, तानसा, कृष्णा, गोदावरी, तापी आणि वैनगंगा अशी या मशिन्सची नावं आहेत. उर्वरित ६ मशिन जुलैपर्यंत मुंबईत दाखल होणार असल्याची माहितीही भिडे यांनी दिली.


कुठली कामे पूर्ण?

आझाद मैदान- या पॅकेज-२ मधील वैतरणा १ आणि २ टीबीएम्सद्वारे ग्रँट रोडपर्यंत ४.५ किमी भुयारी मार्गाचं काम पूर्ण
नयानगर-पॅकेज-४ अंतर्गत कृष्णा १ आणि २ टीबीएम्सद्वारे दादर मेट्रो स्थानकापर्यंत २.५ किमी भुयारी मार्गाचं काम पूर्ण
विद्यानगरी-पॅकेज ५ अंतर्गत गोदावरी १ आणि २ मशिनद्वारे आंतरदेशीय विमानतळ स्थानकापर्यंत २.९७ किमी मार्गाचं काम पूर्ण
मरोळ नाका- पॅकेज ७ अंतर्गत २ टीबीएम मशिनद्वारे आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत १.२ किमी भुयारी मार्गाचं काम पूर्णहेही वाचा-

नाहीतर मेट्रो ३ ला ब्रेक लावू, उच्च न्यायालयाने 'एमएमआरसी'ला ठणकावलं

मेट्रो-३साठी आता मुंबईच्या पोटात ब्लास्टिंग, रहिवाशांमध्ये नाराजी

मेट्रो-३ प्रकल्पातून एमएमआरसी कमावणार पैसा?संबंधित विषय