Advertisement

अखेर मेट्रोसाठीचं पहिलं टीबीएम मशिन मुंबईच्या पोटात शिरलं!


अखेर मेट्रोसाठीचं पहिलं टीबीएम मशिन मुंबईच्या पोटात शिरलं!
SHARES

दोन महिन्यांपूर्वी माहिम नयानगर येथील मेट्रो-3 च्या कामाच्या साईटवरील 60 मीटर व्यासाच्या खोल उभारणी विहिरीत लाल, निळ्या, पिवळ्या आणि हिरव्या रंगातील चक्र अर्थात टीबीएम (टनेल बोअरींग मशिन) सोडण्यात आले होते. या दोन महिन्यांच्या काळात टीबीएम मशिनची या विहिरीत जोडणी करण्यात आली असून शुक्रवारी हे टीबीएम मशिन मुंबईच्या पोटात शिरले आहे. आता हळहळू हे मशिन माहिमवरून पुढे पुढे सरकत दादरमधून बाहेर पडणार आहेत.



17 टीबीएम मशिन येणार मुंबईत!

कुलाबा-वांद्रे-सिप्झ या 33.5 किमी लांबीच्या भुयारी मेट्रो मार्गाच्या कामाला मुंबई मेट्रोरेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी)कडून वेग देण्यात आला आहे. त्यानुसार भुयारी मार्ग खोदण्यासाठी परदेशातून 17 टीबीएम मशिन मुंबईत आणण्यात येणार आहेत. ही मशिन आत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आणि सुरक्षित असल्याचा दावा एमएमआरसीकडून केला जात आहे.



माहिमला दोन टीबीएम मशिन

सध्या मुंबईत पाच टीबीएम मशिन दाखल झाले असून यातील दोन टीबीएम मशिनद्वारे माहिम नयानगर येथे खोदकामाच्या कामाला सुरूवात झाली आहे. तर आझाद मैदान आणि विद्यानगरीत सध्या टीबीएम मशिन जोडणी कऱण्याचे काम जोरात सुरू असल्याची माहिती एमएमआरसीच्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांनी दिली आहे. हे काम अत्यंत अवघड आणि जिकिरीचे असल्याने एमएमआरसीकडून योग्य ती काळजी घेण्यात येत असल्याचा दावा केला जात आहे.



एका दिवसात एक मिलीमीटर सरकले मशिन!

दरम्यान, शुक्रवारी खोदकामाला सुरूवात झाल्यापासून दुपारी तीन वाजेपर्यंत हे टीबीएम मशिन 1 मिलीमीटर इतके पुढे गेल्याचे नयानगर साईटवरील अधिकाऱ्याने सांगितले आहे. सध्या सुरूवात असल्याने हळूहळू हे मशिन पुढे सरकेल. पण त्यानंतर मशिन वेग घेईल आणि तबब्ल वर्षभरानंतर दादरमधून बाहेर पडेल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. तर दुसरे टीबीएम मशिनही याच उभारणी विहिरीत जोडण्यात आले आहे. हे दुसरे टीबीएम मशिन पुढच्या आठवड्यात खोदकामाला सुरूवात करणार आहे.

मेट्रो-3 ला एकीकडे विरोध होत असला, उच्च न्यायालयात मेट्रो-3 विरोधात याचिकांवर याचिका दाखल होत असल्या, तरी दुसरीकडे मात्र मेट्रो-3 चे काम वेगात सुरू असल्याचे चित्र आहे. 2021 मध्ये मेट्रो-3 चे काम पूर्ण करत मेट्रो-3 मुंबईकरांच्या सेवेत दाखल करण्याचा दावाही एमएमआरसी करत आहे.



हेही वाचा

मेट्रो ३ साठी आरेतील ४४४ झाडांवर कुऱ्हाड?


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा