Advertisement

मेट्रो-७ दुर्घटना: कंत्राटदाराला ५ लाखांचा दंड

मेट्रो ७ प्रकल्पाच्या दुर्घटनेप्रकरणी अखेर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (एमएमआरडीए)ने कंत्राटदाराला जबाबदार धरत त्याला ५ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

मेट्रो-७ दुर्घटना: कंत्राटदाराला ५ लाखांचा दंड
SHARES

दहिसर-अंधेरी मेट्रो-७ प्रकल्पाच्या कामादरम्यान २ आठवड्यांपूर्वी पिलर कोसळून एक मजूर जखमी झाला होता. या दुर्घटनेप्रकरणी अखेर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (एमएमआरडीए)ने कंत्राटदाराला जबाबदार धरत त्याला ५ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.


कशी घडली घटना?

वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर २१ आॅक्टोबरला गोरेगाव ते आरेदरम्यान सुरू असलेल्या मेट्रो-७ च्या आरे मेट्रो स्थानकाच्या कामातील पिलर क्रमांक पी ५ कोसळला. मात्र त्यादिवशी भाऊबिजेची सुट्टी असल्याने साईटवर कामगारांची वर्दळ कमी होती. त्यामुळे मोठी जिवीतहानी टळली. परंतु या दुर्घटनेत एक मजूर जखमी झाला.


म्हणून ठोठावला दंड

दुर्घटनेनंतर 'एमएमआरडीए'कडून या प्रकरणाची चौकशी लावण्यात आली होती. या चौकशीनुसार कंत्राटदार जे. कुमारला जबाबदार धरत ५ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. जे. कुमारने कामाच्या ठिकाणी (साईटवर) सुरक्षेच्यादृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना केल्या नव्हत्या, असे म्हणत जे. कुमारला हा दंड ठोठावण्यात आल्याची माहिती 'एमएमआरडीए'चे सहप्रकल्प संचालक (जनसंपर्क) दिलीप कवठकर यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना दिला आहे.हेही वाचा-

जलवाहिन्या तोडल्या, द्या नुकसान भरपाई! महापालिकेचा मेट्रो काॅर्पोरेशनला दणका

एमएमआरसीची शक्कल; डाॅक्युमेन्ट्रीच्या माध्यमातून मेट्रो-3 बाबत करणार जनजागृती


Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा