Advertisement

गोरेगावमध्ये मेट्रो ७ चा पिलर कोसळून एक मजूर जखमी


गोरेगावमध्ये मेट्रो ७ चा पिलर कोसळून एक मजूर जखमी
SHARES
Advertisement

एका बाजूला कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो ३ च्या कामाला वादाचं ग्रहण लागलेलं असताना गोरेगावमध्ये अंधेरी ते दहिसर या मेट्रो ७ च्या कामादरम्यान पिलर कोसळून एक मजूर जखमी झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली.

वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर गोरेगाव ते आरेदरम्यान हा पिलर कोसळला. भाऊबीजेच्या सुटीमुळे या साईटवर कामगारांची फारशी वर्दळ नव्हती तसेच पिलर कोसळण्याच्या काही क्षण आधीच एक बेस्टची बस आणि काही वाहनेही रस्त्यावरून गेली होती. त्यामुळे मोठी दुर्घटना टळल्याचं म्हणावं लागेल.

जखमी कामगारावर त्वरीत उपचार करण्यात आले, तर पिलर कोसळल्यानंतर तो पुन्हा उभारण्याचं कामही सुरू करण्यात आलं आहे.


असा आहे मार्ग

अंधेरी पूर्व-शंकरवाडी-जेव्हीएलआर जंक्शन-महानंद-आरे-पठाणवाडी-पुष्पापार्क-बनडोंगरी-महिंद्रा अँड महिंद्रा-मागठाणे-देवीपाडा-नॅशनल पार्क-ओव्हरीपाडा आणि दहिसर पूर्व असा मेट्रो ७ चा मार्ग आहे.


संबंधित विषय
Advertisement