Advertisement

एमटीएचएल आणि मेट्रो-४ साठी कंत्राटदाराची नियुक्ती


एमटीएचएल आणि मेट्रो-४ साठी कंत्राटदाराची नियुक्ती
SHARES

शिवडी-न्हावा-शेवा सागरी मार्ग अर्थात मुंबई ट्रान्सहार्बर लिंक (एमटीएचएल) साठी अखेर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली आहे. 'एमएमआरडीए'च्या कार्यकारी समितीच्या बैठकीत गुरूवारी ३ टप्प्यांमध्ये 'एमटीएचएल'चं काम करण्यासाठी ३ कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर वडाळा-घाटकोपर-मुलुंड-ठाणे-कासारवडवली या मेट्रो-४ च्या कामासाठी सल्लागाराचीही नियुक्ती करण्यात आल्याची माहिती महानगर आयुक्त यूपीएस मदान यांनी दिली.


'एमटीएचएल'चं काम ३ टप्प्यांत

'एमटीएचएल'चं काम बऱ्याच वर्षांपासून रखडलं आहे. आता कंत्राटदाराची नियुक्ती झाल्याने लवकरच या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरूवात होण्याची शक्यता आहे. २२ किमी लांबीच्या या प्रकल्पाचं काम तीन टप्प्यात होणार आहे.

टप्पा
ठिकाण
कंत्राटदार
पॅकेज १
शिवडीकडील बाजू
मे. एल अॅण्ड टी-आयएचआय
पॅकेज २
नवी मुंबईकडील बाजू
मे. देवू-टिपीएल (जेव्ही)
पॅकेज ३
चिर्ले
मे. एल अॅण्ड टी

 

संकल्पचित्रासाठीही नियुक्ती

मेट्रो-४ प्रकल्पाचं विस्तृत संकल्पचित्र तयार करण्यासाठी मे.सिस्ट्रा एम. व्ही. ए. या कंपनीची नियुक्तीही या बैठकीत करण्यात आली आहे. तर राष्ट्रीय महामार्ग-४ वरील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी येथे एक नवा उड्डाणपूल 'एमएमआरडीए'कडून बांधण्यात येणार आहे. या उड्डाणपुलाच्या बांधकामासाठीही कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली आहे. हे कंत्राट मे. टी अॅण्ड टी इन्फ्रा प्रा. लि.ला दिलं आहे.या प्रकल्पाच्या कामाचा समावेश राष्ट्रीय महामार्ग-४च्या रूंदीकरणाच्या कामात असणार आहे.

वडाळा ट्रक टर्मिनलच्या इमारतीच्या प्रकल्पासाठीच्या सल्लागाराचं कंत्राटही या बैठकीत देण्यात आलं आहे. त्यानुसार इमारतीचे डिझाईन तयार करत बांधकामासाठी करार तयार करणे आणि कामावर देखरेख अशा कामांचे कंत्राट मे. फेअरवुड इऩ्फ्रा अॅण्ड सर्व्हिसेस या कंपनीला देण्यात आलं आहे.


एमटीएचएल, मेट्रो-४, राष्ट्रीय महामार्ग-४ वरील उड्डाणपूल हे तिन्ही प्रकल्प मुंबईसह मुंबई महानगर प्रदेशाच्या विकासाच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचे प्रकल्प आहेत. कारण या प्रकल्पाच्या पूर्णत्वानंतर मुंबईसह मुंबई महानगरातील वाहतूक व्यवस्था मजबूत होणार असून वाहतूककोंडी फुटण्यास मदत होणार आहे. त्याचवेळी मुंबई आणि नवी मुंबईमधील अंतर कमी होणार आहे. त्यामुळे असेही महत्त्वाकांक्षी प्रकल्प वेळेत पूर्ण करत हे प्रकल्प नागरिकांच्या सेवेत दाखल करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
- यूपीएस मदान, महानगर आयुक्त, एमएमआरडीए

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा