Advertisement

एमएमआरमधील अनेक परिसरात लोडशेडिंग, मुंबईकरांना मात्र दिलासा


एमएमआरमधील अनेक परिसरात लोडशेडिंग, मुंबईकरांना मात्र दिलासा
SHARES

ऑक्टोबर हिटचा तडाखा वाढला असून परिणामी राज्यभरात विजेची मागणी ३००० हजार मेगावॅटने वाढली आहे. मात्र ही मागणी पूर्ण करण्यात महावितरणाला काही यश येताना दिसत नाही. कोळशाचा तुटवडा, कोयनेच्या पाण्याचा वापर कमी झाल्याने आणि मागणी वाढल्याने आवश्यक तेवढा वीजपुरवठा करता येत नसल्याचं महावितरणचं म्हणणं आहे. त्यामुळेच राज्यात भारनियमन अर्थात लोडशेडिंग लागू करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती महावितरणचे मुख्य जनसंपर्क अधिकारी पी. एस. पाटील यांनी 'मुंबई लाईव्ह'ला दिली आहे.


लोडशेडिंग सुरू

जी-१ जी-२ आणि जी-३ मध्ये म्हणजेच मुंबई, ठाणे, मुलुंड वगळता मुंबई महानगर प्रदेशातील कल्याण-भिवंडीसह राज्यभर सोमवारपासून लोडशेडिंग सुरू करण्यात आल्याचंही त्यानी सांगितलं आहे. उकाडा वाढला असतानाच लोडशेडिंग सुरू झाल्यानं नागरिकांच्या अडचणी आता वाढल्या आहेत.


म्हणून लोडशेडिंगचा निर्णय

राज्यात दरदिवशी अंदाजे १७००० मेगावॅट विजेची गरज लागते. असं असतांना ही मागणी थेट २०००० मेगावॅटच्या घरात गेली आहे. वाढत्या उकडा आणि शेतकऱ्यांनी कृषी पंपाचा वापर वाढवल्याने विजेची मागणी ३००० मेगावॅटने वाढली आहे. मात्र दुसरीकडे कोळशाचं उत्पन्न घटल्यानं वीजनिर्मितीसाठी कोळशाचा तुडवडा निर्माण झाला आहे. तर कोयनेसह औष्णिक ऊर्जा प्रकल्पातुन वीजही कमी उपलब्ध होत आहे. त्यामुळे ३००० मेगावॅट विजेची वाढती मागणी पूर्ण करणं महावितरणला शक्य होताना दिसत नाही. या पार्श्वभूमीवर लोडशेडिंगचा निर्णय घेतला आहे.


मुंबईकरांना दिलासा

लोडशेडिंगला सोमवारपासून सुरुवात झाल्यानं मुंबई, ठाणे परिसर वगळून सर्व राज्याला लोडशेडिंगच्या झळा सोसाव्या लागत आहेत आणि त्याही ऐन उन्हाच्या झळा वाढल्या असताना. दरम्यान मुंबईत दररोज ३ हजार ३३० मेगावॅटची गरज असून ही वीजनिर्मिती मुंबईच्या वीजनिर्मिती केंद्रातून होत आहे. मुंबईसाठी पुरेशी वीजनिर्मिती होत असल्यानं मुंबईकरांना मात्र दिलासा मिळताना दिसत आहे.

ही परिस्थिती अशीच सुरू राहिली तर वीजेचा तुडवडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिवाळीत राज्य अंधारात जाण्याची भीती दाट झाली आहे.


हेही वाचा -

मुंबई अंधारात! एेन दिवाळीच्या तोंडावर भांडुप, मुलुंडमध्ये अडीच तास लोडशेडिंग

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा