Advertisement

राज्यातील १८० तालुके दुष्काळसदृश; मुख्यमंत्र्यांची घोषणा


राज्यातील १८० तालुके दुष्काळसदृश; मुख्यमंत्र्यांची घोषणा
SHARES

राज्यातील १८० तालुके दुष्काळसदृश असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केली अाहे. या तालुक्यांमधील दुष्काळसदृश परिस्थितीचा सामना करण्यासाठी ८ सुत्री कार्यक्रमांची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली अाहे. 


केंद्राची टीम पाहणी करणार 

पिण्याच्या पाण्यासाठी टँकर योजना, रोहयोअंतर्गत कामाच्या निकषात सूट,  विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात सूट, टंचाईग्रस्त गावातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची वीज जोडणी खंडित न करणे, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थिगित, जमीन महसुलातून सूट अादी उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर दिली. दुष्काळसदृश परिस्थितीची घोषणा करण्यात आल्याने केंद्राची टीम येऊन पाहणी करणार आहे. त्यानंतर मदतीची घोषणा करण्यात येईल, असंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं. 


फसवण्याचा धंदा बंद करा 

काँग्रेस राष्ट्रवादीकडून सातत्याने राज्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली जात होती. शिवसेनेनेही दुष्काळ घोषीत करण्याची मागणी करून अांदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर फडणवीस यांनी ही घोषणा केली अाहे. मात्र, यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी टीका केली अाहे. लोकांचा फसवण्याचा धंदा बंद करा अशी टीका करून दुष्काळसदृश परिस्थिती नाही तर दुष्काळ जाहीर करा अशी मागणी चव्हाण यांनी केली अाहे. 



हेही वाचा - 

२०१९ मध्ये भाजपाची सत्ता जाणार- पवार

युती करा नाहीतर एकत्रित निवडणुकांना सामोरे जा, अमित शहांचा शिवसेनेला इशारा




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा