Advertisement

२०१९ मध्ये भाजपाची सत्ता जाणार- पवार

केंद्र आणि राज्यात सत्ता परिवर्तन होऊन सध्या ज्यांच्या हातात सत्ता आहे, ती सत्ता त्यांच्या हाती राहणार नाही, असं भाकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईत एका वृत्तवाहिनीशी बोलताना केलं.

२०१९ मध्ये भाजपाची सत्ता जाणार- पवार
SHARES

पुढील वर्षी म्हणजेच २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत कुठल्याही एका पक्षाला बहुमत मिळेल असं वाटत नाही. तसंच केंद्र आणि राज्यात सत्ता परिवर्तन होऊन सध्या ज्यांच्या हातात सत्ता आहे, ती सत्ता त्यांच्या हाती राहणार नाही, असं भाकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईत एका वृत्तवाहिनीशी बोलताना केलं.


महाआघाडी महत्त्वाची

महाआघाडीसंदर्भात बोलताना पवार म्हणाले, पुढील निवडणुकीत कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नसल्याने महाआघाडी महत्त्वाची ठरेल. माझे सर्व पक्षांसोबत चांगले संबंध असल्याने सर्व पक्षांना एकत्रित आणण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. कुठलाही पक्ष इतर पक्षांना सोबत घेऊन सरकार बनवू शकतो. शिवाय प्रत्येक राज्यात राज्यस्तरीय आघाडी करण्यासाठीही आम्ही प्रयत्नशील राहू. जो ज्या राज्यात निवडून येईत केंद्रात त्या पक्षासोबत सरकार स्थापण्याबाबत नंतर विचार करू.


भाजपाला हरवण्यासाठी एकत्र

उत्तर प्रदेशात बहुजन समाजवादी पक्ष आणि समाजवादी पक्ष भाजपाला हरवण्यासाठी एकत्र आलेत. त्यामुळे या राज्यातील निवडणुकीत त्यांना चांगला निकाल मिळण्याची शक्यता आहे. माझी तर इच्छा आहे की प्रत्येक राज्यात विरोधी पक्षांची आघाडी व्हावी. परंतु प्रत्येक राज्यातील पक्षांची स्थिती वेगवेगळी आहे.


भाजपासोबत जाणार नाही

भाजपासोबत जाणार का? या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, कुठल्याही परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस भाजपासोबत युती करणार नाही. मग ते नितीन गडकरी असोत किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापैकी कुणीही पुढाकार घेतला तरी राष्ट्रवादी भाजपासोबत युतीचा विचार करणार नाही.


पंतप्रधान कोण ?

पंतप्रधान पदाबाबतच्या प्रश्नावर पवार यांनी उत्तर दिलं की, २०१९ मध्ये कोण पंतप्रधान होईल हे आताच सांगता येणार नाही. २००४ मध्ये कुणाच्याही ध्यानी मनी नसताना मनमोहन सिंग पंतप्रधान झाले. त्याच पद्धतीने पुढचा पंतप्रधान कोणत्या पक्षाचा असेल, त्याचं नाव आताच सांगता येणार नाही.

काँग्रेसकडून राहुल गांधी यांचं नाव पंतप्रधान म्हणून पुढे केलं जात नाही. कारण सध्याची जी राजकीय परिस्थिती आहे, त्या परिस्थितीत केवळ एखाद्या व्यक्तीचं नाव पंतप्रधान पदासाठी पुढे करून निवडणूक जिंकता येणार नाही.



हेही वाचा-

युती करा नाहीतर एकत्रित निवडणुकांना सामोरे जा, अमित शहांचा शिवसेनेला इशारा

फेरीवाला धोरणाची नीट अंमलबजावणी करा नाहीतर.., राज यांचा आयुक्तांना इशारा



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा