Advertisement

फेरीवाला धोरणाची नीट अंमलबजावणी करा नाहीतर.., राज यांचा आयुक्तांना इशारा

मनसेच्या आंदोलनानंतर मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरातील महापालिकांनी नियमानुसार अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई केली असली, तरी सध्या परिस्थिती पुन्हा 'जैसे थे'च दिसत आहे. त्यामुळे मनसेने पुन्हा एकदा फेरीवला धोरणाची आठवण महापालिकांना करून द्यायचं ठरवलेलं दिसत आहे.

फेरीवाला धोरणाची नीट अंमलबजावणी करा नाहीतर.., राज यांचा आयुक्तांना इशारा
SHARES

फेरीवाला धोरण आणि त्यातील नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करा, नाहीतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पुन्हा एकदा या विषयावर आंदोलन हाती घ्यावं लागेल, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई महापालिकेला दिला आहे. मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता यांना पत्र लिहून हा इशारा राज यांनी दिला आहे.

एल्फिन्स्टन पूल दुर्घटनेनंतर रेल्वे स्थानक तसंच स्टेशन परिसरात अनधिकृतपणे बसणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात मनसेने आंदोलन हाती घेतलं होतं. या आंदोलनानंतर मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरातील महापालिकांनी नियमानुसार अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई केली असली, तरी सध्या परिस्थिती पुन्हा 'जैसे थे'च दिसत आहे. त्यामुळे मनसेने पुन्हा एकदा फेरीवला धोरणाची आठवण महापालिकांना करून द्यायचं ठरवलेलं दिसत आहे.




काय आहे पत्रात?

मुंबई महापालिकेने फेरीवाला धोरणाअंतर्गत फेरीवाल्यांसाठी शहरात १० हजार जागा निश्चित केल्या आहेत. एकूण ६ वाॅर्डांमध्ये या जागांची विभागणी करण्यात आली आहे. या जागांवर व्यवसाय करण्यासाठी अधिकृत फेरीवाल्यांना परवाना आणि अधिवास पत्र (डोमिसाईल) महापालिकेकडे जमा करावं लागणार आहे. असं असलं तरी डोमिसाईल बंधनकारक करण्याला फेरीवाला संघटनांचा विरोध आहे. विशेषकरून काँग्रेसची फेरीवाला संघटना या नियमाला कडाडून विरोध करत आहे.




कारवाई करा, नाहीतर...

त्यामुळे फेरीवाला धोरणाच्या नियमानुसार अधिकृत फेरीवाल्यांकडून डोमिसाईल घेतल्यावरच त्यांना जागा देण्यात यावी तसंच ही प्रक्रिया जलदगतीने राबवण्यात यावी, अधिकृत परवाने वाटताना महापालिका अधिकाऱ्यांकडून कुठेही नियमांचं उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी, अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करावी, नाहीतर, मनसेला पुन्हा एकदा आपल्या पद्धतीने कारवाई करावी लागेल, असं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.



हेही वाचा-

फेरीवाल्यांचं पुनर्वसन पुढच्याच आठवड्यात,१५ ऑक्टोबरपर्यंत ‘डोमिसाईल’ सादर करण्यास मुदतवाढ

#MeToo: नाना 'तसे' नाहीत, राज यांनी केली पाठराखण!

गुजराती माणूस हुशार आहे, हे आता कळतच आहे; राजचा मोदींना टोमणा



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा