Advertisement

गुजराती माणूस हुशार आहे, हे आता कळतच आहे; राजचा मोदींना टोमणा

मराठी माणसाला नेहमीच कमी लेखलं जातं. तो उद्योगधंदा करू शकत नाही, हा मोठा गैरसमज असून हे खूळ आधी डोक्यातून काढून टाकण्याचा सल्लाही यावेळी राज ठाकरे यांनी दिला

गुजराती माणूस हुशार आहे, हे आता कळतच आहे; राजचा मोदींना टोमणा
SHARES

ईव्हीएम मशीनचा मुद्दा असो वा इतर कोणताही राजकीय मुद्दा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. अगदी राजकीय विषयाबाहेरही राज ठाकरे मोदींना घेरत अाहेत हेच सोमवारी एका कार्यक्रमात स्पष्ट झालं. हाॅटेल ताज येथे वृत्तपत्र विक्रेत्यांकडून आयोजीत 'मी उद्योजक होणारच' या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी तरूणांना उद्योजक होण्यासाठी काय करायला हवं याचे सल्ले दिले. मात्र त्याच वेळी मोदींना अलगत चिमटाही काढला. गुजराती माणूस हा हुशार आहे, याच्याबद्दल वादच नाही, ते आता आपल्याला कळतच आहे, असा टोमणा राज ठाकरे यांनी मोदींना मारला अाहे.



पुस्तकं वाचून उद्योजक होत नाही

यावेळी राज ठाकरे यांनी वृत्तपत्र विक्रेत्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी शिवसेना नेते मनोहर जोशी  उपस्थित होते. दोघांमध्ये यावेळी चांगलीच टोलेबाजी दिसून आली. पुस्तक वाचून धंदा करता येत नाही. यशाची गुरूकिल्ली, यशस्वी कसे व्हावे अशी पुस्तकं वाचून कुणीही उद्योजक होत नाही, असं सांगत राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात उद्योगधंद्यासाठी पोषक वातावरण आहे, तेव्हा त्या वातावरणाचा फायदा घ्या आणि उद्योगधंदा सुरू करा, असा मोलाचा सल्ला दिला.

मेहनत करा

मराठी माणसाला नेहमीच कमी लेखलं जातं. तो उद्योगधंदा करू शकत नाही, हा मोठा गैरसमज असून हे खूळ आधी डोक्यातून काढून टाकण्याचा सल्लाही यावेळी राज ठाकरे यांनी दिला.  बाहेरच्या राज्यातील माणसं का महाराष्ट्रात येतात याचा जरा विचार करा. बाहेरच्या राज्यात जाऊन बघा, म्हणजे तुम्हा समजेेल की तुम्ही किती चांगल्या ठिकाणी जन्माला आला आहात, किती चांगल्या राज्यात तुम्ही राहत आहात. इतर राज्यामध्ये वाईट स्थिती असल्यानं आणि महाराष्ट्रात सर्वच दृष्टीनं पोषक वातावरण असल्यानं परराज्यातून लोक राज्यात येत असल्याचंही राज ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.  तर चटके खाल्याशिवाय काहीही मिळत नाही असं सांगत मराठी माणसांना मेहनत करण्याचा सल्लाही त्यांनी दिला. 



हेही वाचा -

राष्ट्रवादीचा सरकारविरोधात १५ ते २० ऑक्टोबरदरम्यान राज्यभर एल्गार

मोदी-अंबानी आरतीतून मोदींच्या विष्णू अवताराची जितेंद्र आव्हाडांकडून खिल्ली




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा