राष्ट्रवादीचा सरकारविरोधात १५ ते २० ऑक्टोबरदरम्यान राज्यभर एल्गार


SHARE

राज्यात निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती, वीज लोडशेडिंग, पेट्रोल-डिझेलचे दिवसागणिक वाढणारे भाव आणि महागाईची झळ या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मैदानात उतरला अाहे. १५ ते २० ऑक्टोबर या कालावधीत राष्ट्रवादी काँग्रेस राज्यभर निषेध मोर्चे काढणार  असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी दिली.


मंत्र्यांच्या गाडया अडवणार

केंद्र आणि राज्यात असलेल्या भाजप-शिवसेना सरकारचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने आठवडाभर तहसील आणि उपविभागीय कार्यालयावर निषेध मोर्चे काढण्यात येणार आहेत. या निषेध मोर्चाने सरकारला जाग आली नाही तर मंत्र्यांच्या गाडया अडवून त्यांना घेराव घालून जाब विचारला जाणार अाहे. १५ ते २० ऑक्टोबर दरम्यान निषेध मोर्चे काढतानाच उपविभागीय अधिकारी किंवा तहसिलदारांना समस्यांचं निवेदनही दिले जाणार असल्याचं
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितलं.हेही वाचा -

मोदी-अंबानी आरतीतून मोदींच्या विष्णू अवताराची जितेंद्र आव्हाडांकडून खिल्ली

'त्या' पुस्तकाच्या लेखक, प्रकाशकावर कारवाई करा - धनंजय मुंडे
संबंधित विषय
ताज्या बातम्या