Advertisement

मोदी-अंबानी आरतीतून मोदींच्या विष्णू अवताराची जितेंद्र आव्हाडांकडून खिल्ली

कल्की अवतारानंतर भगवान विष्णू मोदींच्या रूपात अवतरल्याचा साक्षात्कार भाजपच्या एका प्रवक्त्यांना झाला अाहे. आता देव आहेच म्हटल्यानंतर वाहन, मंदीर, आरती सोपस्कार आलेच. याबद्दलच विचार करत असताना या नव्या देवाची आरती रचण्याचा प्रयत्न आपण केला आहे.

मोदी-अंबानी आरतीतून मोदींच्या विष्णू अवताराची जितेंद्र आव्हाडांकडून खिल्ली
SHARES

भाजपाचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे अकरावे अवतार असल्याचं शनिवारी म्हटलं होतं. यावर देशभरातून टीका होत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गणपतीच्या एका आरतीच्या धर्तीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांच्यावर चक्क आरती केली आहे. विशेष म्हणजे त्यांनी गणपती आरतीच्या सुरात जशी गायिली जाते, त्याच सुरात गाऊन ही आरती त्यांनी आपल्या फेसबुक पेजवर टाकली आहे. या आरतीला सोशल मीडियावर मोठी पसंती मिळत अाहे. आहे. तर अनेक मोदी भक्तांनी यावर टीकाही सुरू केली आहे.



नव्या देवाची आरती 

आव्हाड यांनी ही कविता का केली याचा खुलासाही केला अाहे.  त्यांनी म्हटलं की, आज फेसबुक बघत असताना अचानक विमानावर स्वार मोदींचा विष्णूच्या अकराव्या अवतरातला फोटो पहिला. कल्की अवतारानंतर भगवान विष्णू मोदींच्या रूपात अवतरल्याचा साक्षात्कार भाजपच्या एका प्रवक्त्यांना झाला अाहे. आता देव आहेच म्हटल्यानंतर वाहन, मंदीर, आरती सोपस्कार आलेच. याबद्दलच विचार करत असताना या नव्या देवाची आरती रचण्याचा प्रयत्न आपण केला आहे.



हेही वाचा -

'त्या' पुस्तकाच्या लेखक, प्रकाशकावर कारवाई करा - धनंजय मुंडे

स्टॅच्यू ऑफ युनिटी' च्या अनावरण कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांना निमंत्रण



 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा