पालघर स्थानकातील रेल्वे पोलिसांची ड्युटी ८ तास

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

पश्चिम रेल्वेच्या महत्वाच्या स्थानकांपैकी पालघर या स्थानकातील रेल्वे पोलिसांची (जीआरपी) ड्युटीचे तास कमी करण्यात आले आहेत. पहिल्यांदाच पालघर स्थानकातील १४० रेल्वे पोलिसांची ड्युटीची वेळ ८ तास केली आहे. त्यामुळं आता पालघरच्या रेल्वे पोलिसांना होणारा त्रास कमी होण्याची शक्यता आहे. 

८ तासांची ड्युटी  

दररोज १२ तास ड्युटी आणि त्यानं होणाऱ्या त्रासानं पोलीसांना आजाराची लागण होते. याची मुंबई पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी दखल घेत देवनार पोलीस ठाण्यात प्रायोगिक तत्त्वावर ‘आठ तासांची ड्युटी’ हा उपक्रम सुरू केला. या उपक्रमाला मिळालेला प्रतिसाह पाहून मुंबईमधील बहुतांश पोलीस ठाण्यांत ८ तास ड्युटी सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार आता रेल्वे पोलिसांनी देखील १ एप्रिलपासून या उपक्रमाला सुरूवात केली असून आता रेल्वे पोलिसांची ड्युटी ८ तास करण्यात आली आहे. 

३ शिफ्टमध्ये काम

'पालघर स्थानकातील रेल्वे पोलिस तीन शिफ्टमध्ये काम करतात. पहिल्या दोन शिफ्टमधील पोलीस ८ तास काम करतात. परंतु, तिसऱ्या शिफ्टमधील पोलिसांना १० तास काम करावं लागतं होतं. तसंच, घाटकोपर आणि अन्य स्थानकांतुन पालघर स्थानकात येणाऱ्या पोलिसांचे दररोज २ तास  प्रवासात जात असल्यानं त्यांना १६ तास काम कराव लागतं होतं. त्यामुळं त्यांची तब्येत बिघडत होती', अशी माहिती जीआरपी कमिश्नर निकेट कौशिक यांनी एका वृत्तवाहिना दिलेल्या मुलाखतीत दिली. 


हेही वाचा -

वैद्यकीय शिक्षणात आरक्षण न मिळाल्यानं मराठा विद्यार्थ्यांचं आंदोलन

'इथं' मिळत फक्त १० रुपयात जेवण


पुढील बातमी
इतर बातम्या