Advertisement

'इथं' मिळत फक्त १० रुपयात जेवण

मुलुंड, माटुंगा आणि बोरिवली इथल्या राज रोटी सेंटरमध्ये गरजूंना चक्क १० रुपयात पोटभर जेवता येतं. या सेंटरमधल्या ५ महिलांनी ही जबाबदारी उचलली आहे. मीना गोशार यांनी ही संकल्पना प्रत्यक्षात राबवली.

'इथं' मिळत फक्त १० रुपयात जेवण
SHARES

पोट भरण्यासाठी १० रुपयात हल्ली साधा वडापाव देखील मिळत नाही. चपाती भाजी तर दूरची गोष्ट. पण जर तुम्हाला सांगितलं की, १० रुपयात चपाती-भाजी मिळेल तर? १० रुपयात मिळणारा जमाना गेला? आताच्या जमान्यात १० रुपयात कसं काय शक्य आहे? १० रुपयात चपाती भाजी? पण तुम्ही अगदी बरोबर वाचताय.


पोटभर जेवण

मुलुंड, माटुंगा आणि बोरिवली इथल्या राज रोटी सेंटरमध्ये गरजूंना चक्क १० रुपयात पोटभर जेवता येतं. या सेंटरमधल्या ५ महिलांनी ही जबाबदारी उचलली आहे. मीना गोशार यांनी ही संकल्पना प्रत्यक्षात राबवली. सध्या हे सेंटर फक्त ३ ठिकाणी सुरू आहे. पण येत्या काळात आणखी सेंटर उभारण्यात यावेत, असा त्यांचा मानस आहे.


फक्त एकच अट

१० रुपयात ६ चपात्या, एक पातळ भाजी आणि एक केळं असं पोटभर तुम्हाला खाता येईल. पण यासाठी एकच अट आहे ती म्हणजे, तुमची कमाई ७ हजाराहून कमी हवी. याशिवाय शारिरीकरित्या दुर्बल आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी देखील ही सेवा उपलब्ध आहे.

एकवेळ तुम्हाला गरज नसेल. पण ज्या गरजूंना याची गरज आहे त्यांच्यापर्यंत हा संदेश नक्की पोचवा.

कुठे : जवाहर टॉकीज कम्पाऊंड, डॉ. राजेंद्र प्रसाद रोड, मुलुंड (पू.)

संपर्क : ०९३२३३३३९८३
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा