Advertisement

वैद्यकीय शिक्षणात आरक्षण न मिळाल्यानं मराठा विद्यार्थ्यांचं आंदोलन

वैद्यकीय शिक्षणात मराठा विद्यार्थ्यांना आरक्षण न मिळाल्यानं विद्यार्थ्यांनी मुंबईतील आझाद मैदान इथं आंदोलन सुरू केलं आहे. सरकारनं आरक्षणासंदर्भात विद्यार्थ्यांची दिशाभूल केल्यानं विद्यार्थ्यांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे. विद्यार्थ्यांनी सीएसएमटीबाहेर घोषणाबाजी केली.

वैद्यकीय शिक्षणात आरक्षण न मिळाल्यानं मराठा विद्यार्थ्यांचं आंदोलन
SHARES

मराठा आरक्षणासाठी राज्यभरात ५० हून अधिक मोर्चे अगदी शांततेत निघाले. त्यानंतर मराठा समाजाला ३० नोव्हेंबर २०१८ रोजी महाराष्ट्रात मराठा आरक्षण लागू करण्यात आलं. मात्र नागपूर खंडपीठानं दिलेल्या निर्णयानुसार या आरक्षणाचा लाभ मेडिकल विभागातील कोणत्याच विद्यार्थ्याला घेता येणार नाही. वैद्यकीय शिक्षणात मराठा विद्यार्थ्यांना आरक्षण न मिळाल्यानं विद्यार्थ्यांनी मुंबईतील आझाद मैदान इथं आंदोलन सुरू केलं आहे. सरकारनं आरक्षणासंदर्भात विद्यार्थ्यांची दिशाभूल केल्यानं विद्यार्थ्यांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे. विद्यार्थ्यांनी सीएसएमटीबाहेर घोषणाबाजी केली. तसंच, मराठा समाजाला एसईबीसी आरक्षण जाहीर केलेलं असताना विद्यार्थ्यांना वैद्यकीय सेवेत का सामावून घेतलं जात नाही, असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे.


मेडिकलचं नोटिफिकेशन

मराठा आरक्षण लागू होण्याआधी म्हणजेच १३ नोव्हेंबर रोजी मेडिकलचं नोटिफिकेशन आलं होतं. त्यामुळं ३० नोव्हेंबरपासून लागू झालेल्या मराठा आरक्षणाचा लाभ मेडिकल क्षेत्रातील मराठा विद्यार्थ्यांना घेता येणार नाही, असं कारण कोर्टाकडून देण्यात आलं होतं. 


सर्व प्रवेश रद्द 

सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गीय (एसईबीसी) प्रवर्गात मोडणाऱ्या मराठा व इतर विद्यार्थ्यांचे पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांतील सर्व प्रवेश रद्द झाल्याचं स्पष्टीकरण देण्याची राज्य सीईटी सेलची विनंती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं शुक्रवारी फेटाळून लावली होती.  


मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावं

प्रवेश प्रक्रिया सुरू झालेल्या वैद्यकीय अभ्यासक्रमांतील जागा एसईबीसी प्रवर्गासाठी आरक्षित करता येणार नाही, असा निर्णय न्यायालयानं २ मे रोजी दिला होता. याबाबत संबंधित स्पष्टीकरण देण्याची विनंती सेलनं केली होती. मात्र, एसईबीसी विद्यार्थ्यांचे प्रवेश हे आरक्षणाविरुद्धच्या याचिकांवरील निर्णयाधीन राहतील, असं न्यायालयानं स्पष्ट केलं असून, अंतिम निर्णयातही सर्व आवश्यक मुद्दे नमूद केले होते. त्यामुळं याबाबत संबंधित स्पष्टकरण मागितल्यानं न्यायालयानं सेलची कानउघाडणी केली होती. दरम्यान, याप्रकरणी 'आता स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालून वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मराठा विद्यार्थ्यांच्या प्रश्न सोडावा', अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.



हेही वाचा -

खासगी बसच्या तिकीट दरात वाढ, प्रवाशांच्या खिशाला कात्री

पेन्शनसंबधींच्या तक्रारी निवरणासाठी पोस्टाची पेन्शन अदालत



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा