पेन्शनसंबधींच्या तक्रारी निवारणासाठी पोस्टाची पेन्शन अदालत

पेन्शनसंबधींच्या तक्रारी निवारणासाठी पोस्ट खात्यानं तक्रार निवारणासाठी पेन्शन अदालत सुरु करण्यात आली आहे. यामध्ये पोस्ट खात्याच्या पेन्शन व्यक्ती आणि परिवाराला आपल्या तक्रारी दाखल करता येणार आहेत.

SHARE

पेन्शनसंबधींच्या तक्रारी निवारणासाठी पोस्ट खात्यानं तक्रार निवारणासाठी पेन्शन अदालत सुरु केली आहे. यामध्ये पोस्ट खात्यातील माजी कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय यांना तक्रारी दाखल करता येतील. फोर्ट येथील जीपीओ बिल्डिंगमधील पोस्टमास्टर जनर यांच्या कार्यालयात ३ जुलै २०१९ रोजी या पेन्शन अदालतचं आयोजन करण्यात आलं आहे.


वेबसाईटवर अर्ज उपलब्ध

महाराष्ट्र पोस्टल सर्कलच्या https://www.maharashtrapost.gov.in या वेबसाईटवर तक्रार अर्ज उपलब्ध असून, ३ जून २०१९ पर्यंत पेन्शन संबधीचं तक्रार अर्ज दाखल करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. धोरणात्मक निर्णय, पदोन्नती किंवा अन्य बाबींसदर्भातल्या तक्रारी यामध्ये घेण्यात येणार नाही आहेत.


३ जूनपर्यंतच्या अर्जांचा समावेश

ज्या लोकांचे तक्रार अर्ज ३ जूनपर्यंत दाखल होतील त्यांच्याच तक्रारींचा या पेन्शन अदालतमध्ये समावेश केला जाणार आहे. ३ जूननंतर प्राप्त होणाऱ्या अर्जाचा पेन्शन अदालतमध्ये समावेश करण्यात येणार नसल्याचं पोस्टातर्फे जाहीर करण्यात आलं आहे.हेही वाचा -

अखेरच्या सामन्यात मुंबईचा कोलकात्यावर ९ गडी राखून विजय

'मोदी तुम्हांला देश कधीही माफ करणार नाही', - राज ठाकरेसंबंधित विषय
ताज्या बातम्या