Advertisement

अखेरच्या सामन्यात मुंबईचा कोलकात्यावर ९ गडी राखून विजय


अखेरच्या सामन्यात मुंबईचा कोलकात्यावर ९ गडी राखून विजय
SHARES

मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात झालेल्या आयपीएलच्या अखेरच्या सामन्यात मुंबईनं तब्बल ९ गडी राखून कोलकातावर विजय मिळवला आहे. या विजयासह मुंबईनं गुणतालिकेत अव्वल स्थान गाठलं आहे. कोलकातानं दिलेलं १३४ धावांचं आव्हान कर्णधार रोहित शर्मा आणि सुर्यकुमार यादव यांच्या नाबाद खेळीच्या जोरावर मुंबईनं सहज पूर्ण केलं. या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने ४८ चेंडूत ५५ धावांची खेळी केली. तर, सुर्यकुमार यादवने ५ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने २७ चेंडूत ४६ धावांची नाबाद खेळी साकारली.


प्रथम गोलंदाजीचा निर्णय 

मुंबईनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम गोलंदाजी करताना हार्दिक पंड्यानं ख्रिस लिन आणि शुभमन गिल या दोन्ही कोलकाताच्या सलामीवीरांना बाद केलं. त्यानंतर कोलकाताचा कर्णधार दिनेश कार्तिकला ३ धावांवर बाद झाला तर, आंद्रे रसेललाे एकही धाव काढता आली नाही. दरम्यान, हार्दिक पांड्या आणि लसिथ मलिंगा यांनी केलेल्या जबरदस्त गोलंदाजीच्या जोरावर मुंबईनं १३३ धावांवर कोलकात्याला रोखण्यात यश मिळवलं. या सामन्यात मलिंगान ३ विकेट्स घेतल्या. तसंच, बुमराह आणि पंड्यानं प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. 


१३४ धावांचे आव्हान 

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना कोलकाताच्या सलामीवीर फलंदाज लिन आणि गिल चांगली सुरूवात केली. लिननं २९ चेंडूत ४१ धावा केल्या. तर गिलनं १६ चेंडूक ९ धावा केल्या. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या उतप्पा यानं ४७ चेंडूत ४० धावा मारत मुंबईसमोर १३४ धावांचे आव्हान ठेवलं. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईनं ९ गडी राखून कोलकाताचा पराभव केला आहे. हेही वाचा -

T20 मुंबई लीग: अर्जुन तेंडुलकरवर ५ लाखांची बोलीRead this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement