Advertisement

T20 मुंबई लीग: अर्जुन तेंडुलकरवर ५ लाखांची बोली


T20 मुंबई लीग: अर्जुन तेंडुलकरवर ५ लाखांची बोली
SHARES

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा चिरंजीव आॅलराऊंडर अर्जुन तेंडुलकर टी-२० मुंबई लीगमध्ये आकाश टायगर्स मुंबई वेस्टर्न सबर्ब संघाकडून खेळणार आहे. मुंबई लीगसाठी झालेल्या लिलावात आकाश टायगर्सने ५ लाख रुपयांची बोली लावून अर्जुनला संघात स्थान दिलं आहे. महत्त्वाची बाब म्हणजे सचिन या टी-२० मुंबई लीगचा ब्रॅण्ड अँम्बेसेडर आहे. लीगचं यंदाचं दुसरं वर्ष आहे.


सर्वाधिक बोली

या लीगसाठी पहिल्यांदाच अर्जुनचं नाव लिलावात सामील करण्यात आलं होतं. आॅलराऊंडर गटात अर्जुनची बेस प्राइज १ लाख रुपये इतकी ठरवण्यात आली होती. लिलावातील चढाओढीत नॉर्थ मुंबई संघाने ५ लाख रुपयांची सर्वाधिक बोली लावली.


बरोबरीची संधी

या बोलीनंतर लिलावाचं सूत्रसंचालन करणारे चारू शर्मा यांनी आकाश टायगर्स मुंबई वेस्टर्न सबर्ब आणि ईगल ठाणे स्ट्रायकर्स या दोन अन्य संघांना बोलीतील बरोबरी करण्याची (ओटीएम) संधी दिली. दोन्ही संघांनी हा पर्याय निवडल्यानंतर बॅगमध्ये ठेवण्यात आलेल्या दोन कार्डपैकी एक कार्ड मुंबई क्रिकेट असोसिएशनचे उमेश खानविलकर यांनी निवडलं. हे कार्ड आकाश टायगर्सचं निघाल्याने अर्जुन आकाश टायगर्सच्या संघात गेला. टी-२० मुंबई लीग येत्या १४ मेपासून वानखेडे स्टेडियमवर सुरू होणार आहे.


'हे' खेळाडू कायम

या लिलावाआधी सूर्यकुमार यादव, आकाश पारकर (ट्रायम्फ नाइट्स मुंबई नॉर्थ ईस्ट), शिवम दूबे, सिद्धेश लाड (शिवाजी पार्क लायन्स), पृथ्वी शॉ (नॉर्थ मुंबई पँथर्स), जय बिस्टा आणि धरमिल मटकर (सोबो सुपरसाॅनिक), शुभम रंजन प्लेयर्स, तुषार देशपांडे (आर्क्स अंधेरी), श्रेयस अय्यर, एकनाथ केरकर (नमो बांद्रा ब्लास्टर्स) यांना ६ फ्रेंचाइजने कायम ठेवलं.हेही वाचा-

सुपर ओव्हरमध्ये हैद्राबादवर विजय मिळवत मुंबई इंडियन्स प्ले-ऑफमध्ये दाखल

एमआयजी क्रिकेट क्लबच्या पॅव्हेलियनला सचिन तेंडुलकरचं नावRead this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा