सुपर ओव्हरमध्ये हैद्राबादवर विजय मिळवत मुंबई इंडियन्स प्ले-ऑफमध्ये दाखल

सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात झालेल्या सामन्यात मुंबईन हैद्राबादवर विजय मिळवत प्ले-ऑफमध्ये प्रवेश केला आहे. प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सनं १६३ धावांचे आव्हान हैदराबादपुढे ठेवलं होतं.

SHARE

सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात झालेल्या सामन्यात मुंबईन हैद्राबादवर विजय मिळवत प्ले-ऑफमध्ये प्रवेश केला आहे. प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सनं १६३ धावांचे आव्हान हैदराबादपुढे ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादचा फलंदाज मनीष पांडेनं नाबाद ७१ धावा करत सामना टाय केला.

१६३ धावांचे आव्हान

या सामन्यात मुंबईनं नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना मुंबईचा सलामीवीर फलंदाज क्विंटन डिकॉक यानं धमाकेदार फलंदाजी केली. डिकॉकनं २ षटकार आणि ६ चौकार मारत ५८ चेंडूत नाबाद ६९ धावा केल्या. त्याशिवाय, या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी दिकॉकला चांगली साथ दिली. तसंच, १६३ धावांचे आव्हान हैदराबादपुढे ठेवलं.


सामना टाय

या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादच्या सलामीवीर फलंदाजांनी चांगली सुरुवात करून दिली. साहानं १५ चेंडूत ५ चौकार मारत २५ धावा केल्या. साहा बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या मनिष पांडेन नाबाद ४७ चेंडूत ८ चौकार आणि २ षटकारांच्या जोरावर नाबाद ७१ धावा करत सामना टाय केला.


सुपर ओव्हर

या सामन्यातील सुपर ओव्हरमध्ये प्रथम फलंदाजी करताना ९ धावांचे लक्ष्य ठेवलं. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईच्या हार्दीक पंड्यानं पहिल्याच चेंडूवर षटकार मारत सामना मुंबईच्या बाजूनं नेला. त्यानंतर पोलार्डनं २ धावा काढत सामना मुंबईच्या नावावर केला. तसंच, प्रथम गोलंदाजी करताना बुमराहनं २ गडी बाद केले. मात्र, हैद्राबादच्या गोलंदाज राशीद खान याला एकही गडी बाद करता आला नाही. 

या सामन्यात प्रथम गोलंदाजी करताना हैदराबादचा जलद गोलंदाज खलील अहमद यानं ३ विकेट्स घेतला. तसंच, भुवनेश्वर कुमार आणि नाबी यांनी प्रत्येकी १-१ विकेट्स घेतल्या. त्याचप्रमाणं, मुंबईकडून बुमराह, कृणाल आणि हार्दिक पंड्या यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.

संबंधित विषय
ताज्या बातम्या