खासगी बसच्या तिकीट दरात वाढ, प्रवाशांच्या खिशाला कात्री

एस. टी. रेल्वे आरक्षण पूर्ण झालं आहे. त्यामुळं खासगी बस चालकांनी बस तिकिटात २५ ते ३० टक्क्यांनी वाढ केली आहे.

SHARE

उन्हाळ्याच्या सुट्टीत मुंबईकर मोठ्या प्रमाणात गावाला जातात. गावाला जाण्यासाठी प्रवासी उन्हाळ्याच्या सुट्टीच्या १ ते २ महिने अगोदरचं एस.टी आणि रेल्वेचं आरक्षण करतात. त्यामुळं ऐन सुट्टीच्या दिवशी प्रवास करण्यासाठी प्रवाशांना जास्त पैसे मोजावे लागतात. सुट्टीच्याचवेळी एस.टी आणि रेल्वेचं आरक्षण पुर्ण झाल्यानं प्रवाशांना खासगी बसनं प्रवास करावा लागतो आहे. मात्र, खासगी बसचे तिकीट दरात प्रचंड वाढ झाल्यानं गावाकडं जाणाऱ्या प्रवाशांच्या खिशाला कात्री लागत आहे.


आरक्षण पुर्ण

एस. टी. रेल्वे आरक्षण पूर्ण झालं आहे. त्यामुळं खासगी बस चालकांनी बस तिकिटात २५ ते ३० टक्क्यांनी वाढ केली आहे. मुंबईतील मतदान झालं असून, शाळांना पडलेल्या सुट्ट्यांमुळे मुंबईतील प्रवासांनी गावची वाट पकडली आहे. मात्र, प्रवाशांना गावी जाण्यासाठी खासगी बसेसच्या तिकीट दरात वाढ झाल्यानं जास्तीचे पैसे मोजावे लागतात. सण आणि सुट्ट्यांदरम्यान खासगी बस कंपन्या तिकिट दरात प्रचंड वाढ करतात. 


तिकीट दरांतील वाढ

मुंबई ते मालवण प्रवासासाठी याआधी ६०० रुपये तिकीट होतं. मात्र, आता ९०० रुपये तिकीट आहे. मुंबई ते कोल्हापूर याआधी ५०० आता ७०० रुपये तिकीट आहे. मुंबई ते कराड याआधी ३५० आता ५५० रुपये तिकीट आहे. मुंबई ते वैभववाडी याआधी ६०० आता ९०० रुपये तिकीट आहे.हेही वाचा -

पेन्शनसंबधींच्या तक्रारी निवरणासाठी पोस्टाची पेन्शन अदालत

'मोदी तुम्हांला देश कधीही माफ करणार नाही', - राज ठाकरेसंबंधित विषय
ताज्या बातम्या