षण्मुखानंदमध्ये कचऱ्यापासून खत निर्मितीवर मार्गदर्शन

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयानंतर इको रॉक्स या संस्थेतर्फे किंग्ज सर्कल येथील षण्मुखानंद सभागृहासाठी कचऱ्यापासून खत निर्मिती हा प्रकल्प राबवला जात आहे. गुरुवारी 9 नोव्हेंबर रोजी संस्थेच्या अध्यक्षा डॉ. हर्षा मेहता, सत्यवान बावलेकर (सहाय्यक अभियंता एफ/उत्तर पालिका), एस. आर. वीराराघवन षण्मुखानंद सभागृहाचे खजिनदार यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उदघाटन करण्यात आले. खत निर्मिती प्रक्रियेचे मार्गदर्शन रश्मी जोशी (इको रॉक्स संस्थेच्या संयुक्त सचिव) यांनी केले.

कचरामुक्ती प्रक्रियेपासून खत निर्मिती

पालिका प्रशासनाच्या आवाहनानुसार गृहनिर्माण सोसायट्या आणि आस्थापनांच्या ठिकाणी कचरा मुक्ती प्रक्रियेला सुरुवात झाली असून षण्मुखानंद या सभागृहाने देखील इको रॉक्स या संस्थेच्या सहकार्याने कचरा मुक्ती प्रक्रियेपासून खत निर्मिती करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. सभागृहात होणारे कार्यक्रम आणि समारंभ यावेळी कँटिंगमधून घेतलेले खाद्यपदार्थ आणि त्याचा कचरा असाच फेकला जातो, तर आता तो कचरा साठवून कचरामुक्ती प्रकल्पाअंतर्गत त्याचा योग्यरीत्या वापर करून खत निर्मिती केली जाणार आहे.

कचऱ्याचा पुनर्वापर व्हावा

कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करून त्याचा योग्य प्रकारे पुनर्वापर करणे गरजेचे आहे. याबद्दलची जागरूकता लोकांमध्ये निर्माण व्हावी यासाठी आमच्या संस्थेकडून याचे मार्गदर्शन केले जाते, असे संस्थेच्या अध्यक्षा डॉ. हर्षा मेहता यांनी सांगितले

यावेळी संस्थेकडून एफ/उत्तर महापालिका विभागाच्या घन कचरा व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी तसेच षण्मुखानंद सभागृहाच्या कँटिंग कर्मचाऱ्यांना देखील या प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यात आले.


हेही वाचा - 

कूपर, भाभानंतर केईएममध्येही होणार खतनिर्मिती


पुढील बातमी
इतर बातम्या