कूपर, भाभानंतर केईएममध्येही होणार खतनिर्मिती

  Parel
  कूपर, भाभानंतर केईएममध्येही होणार खतनिर्मिती
  मुंबई  -  

  कूपर, भाभा या रुग्णालयानंतर आता केईएममध्येही पर्यावरणाचा संकल्प केला गेला आहे. स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियानांतर्गत ‘हरित कचरा कंपोस्टिंग प्रकल्प’ सुरू करण्यात आला आहे.

  केईएम रुग्णालयाच्या आवारात साचणारा पानांचा कचरा म्हणजेच पाला, पाचोळा किंवा भाजीपाला यापासून कंपोस्ट खत निर्माण करण्याचा नवा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. 1 ऑक्टोबरपासून या प्रकल्पाला सुरुवात करण्यात आली आहे.

  केईएम रुग्णालयाच्या आवारात मोठ्या प्रमाणात झाडं असल्याकारणाने झाडांचा सुकलेला पाला-पाचोळा जमिनीवर पडतो. तो कचरा सफाई कर्मचारी जाळून टाकतात. त्यामुळे प्रदूषणही होतं. त्यामुळे हा प्रकल्प राबवण्यात येत आहे.

  केईएम रुग्णालयात मोठं-मोठी झाडं असल्यामुळे आवारात मोठ्या प्रमाणात पाला-पाचोळा साचतो. त्यामुळे सुका, ओला कचरा वेगळा करुन त्यातून खत निर्मिती करण्यात येणार आहे. त्याचा उपयोग आम्ही विविध कामांसाठी करणार आहोत. कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी हा खत निर्मिती प्रकल्प सुरू केला आहे.

  डॉ. अविनाश सुपे, अधिष्ठाता, केईएम रुग्णालय

  शिवाय, सुरूवातीला सुका पाला-पाचोळा रुग्णालयातील मुख्य इमारतीपासून काही अंतरावर असलेल्या एका चौकोनी जागेत जमा केला जाईल. एका यंत्राच्या सहाय्याने हा कचरा बारीक केला जाईल. त्यानंतर त्यात गांडूळ सोडले जातील. गांडूळ हे पाला-पाचोळा खातात आणि त्यांच्या विष्ठेतून गांडूळ खताची निर्मिती करण्यात येणार असल्याचं ही डॉ. अविनाश सुपे यांनी स्पष्ट केलं आहे.  हेही वाचा

  मुंबईत ९७ खतनिर्मिती प्रकल्प सुरु


  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.