Advertisement

सायन रुग्णालयात कचऱ्यापासून खत निर्मित प्रकल्प !


सायन रुग्णालयात कचऱ्यापासून खत निर्मित प्रकल्प !
SHARES

सायनच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात कचऱ्यापासून खत निर्मिती प्रक्लप सुरू करण्यात आला आहे. महापालिकेच्या इशाऱ्यानंतर अनेक सोसायट्यांमध्ये तसेच रुग्णालयांनी आवारात कचरा मुक्त प्रक्रिया राबवायला सुरुवात केली आहे. सायनच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात शून्य कचरा प्रकल्पांतर्गत कचऱ्यापासून खत निर्मिती प्रकल्पाचे बुधवारी १ नोव्हेंबर रोजी रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. जयश्री मोंडकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.


IMG_20171102_132440[1].jpg


कचऱ्यापासून खत निर्मिती

रुग्णालयातून जमा होणारा सुका आणि ओला कचरा वेगळा करून त्याचा खतासाठी उपयोग केला जाणार आहे. रुग्णालयातील अन्न, फळ, भाज्यांचा कचरा, मेडिकल कॉलेज कँटिन, आर. एम. ओ, नर्सेस होम या सर्व ठिकाणाहून सरासरी 300 ते 350 किलो इतका ओला कचरा दररोज जमा होतो. त्यामुळे हा कचरा असाच वाया न घालवता त्यापासून खत निर्मिती करून त्याचा योग्य वापर केला जाऊ शकतो हा प्रकल्पामागचा उद्देश आहे. 


IMG-20171102-WA0002[1].jpg

या प्रकल्पात 'इको - रॉक्स' या संस्थेचे सहकार्य असणार आहे. पहिल्या दिवसांपासून चाळीस दिवसांत तयार होणाऱ्या खताच्या प्रक्रियेचे मार्गदर्शन रश्मी जोशी (इको रॉक्स संस्थेच्या संयुक्त सचिव) यांनी कामगारांना केले, जेणेकरून व्यवस्थितरित्या प्रक्रिया पार पडली जाऊन चांगले खत निर्माण होईल. या खताचा वापर रुग्णालयातील बागेसाठी होणार आहे.


IMG-20171102-WA0007[1].jpg


कूपर रुग्णालयातील गांडूळ खत निर्मिती प्रकल्पानंतर सायनचे लोकमान्य टिळक हे कचऱ्यापासून खत निर्मिती प्रकल्प राबवणारे दुसरे रुग्णालय आहे.


या प्रकल्पअंतर्गत कचऱ्याचे व्यवस्थापन योग्यरित्या केले जाईल. प्रत्येक वार्ड आणि कँटिंनमधून येणारा सुका आणि ओला कचरा वेगळा केला जाईल. त्याचबरोबर जास्तीत जास्त टाकाऊ गोष्टींचा वापर कसा होईल? याकडे लक्ष दिले जाईल
- राजीव कुमार, सहाय्य्क वैद्यकीय अधिकारी - सायन रुग्णालय


हेही वाचा - 

कूपर, भाभानंतर केईएममध्येही होणार खतनिर्मिती


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा