माहूल परिसरातील BPCL कंपनीमध्ये आग

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

चेंबूर येथील माहूल परिसरातील BPCL कंपनीमध्ये आग लागली आहे. मंगळवारी दुपारी १२.२४ वाजताच्या सुमारास आग लागली आहे. आग लागल्याची माहिती मिळताचं घटनास्थळी पोलीस व अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेतली. 

माहूलमधील BPCL कंपनीच्या मेन गेट जवळील परिसरात आग लागली आहे. या आगीत कंपनीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. तसंच, जीवितहानीची माहिती समोर आलेली नाही.

कंपनीमधील ही आग कशी लागली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. या प्रकरणी पोलीस व अग्निशमन दलाचे जवान अधिक तपास करत आहेत. तसंच, आग लागल्यामुळं कंपनीच्या आजूबाजूच्या परिसरात धर पसरला आहे.


हेही वाचा -

कांद्यानंतर आता कडधान्य, डाळी महागल्या

बेस्ट कर्मचाऱ्यांचा २७ जानेवारीला मोर्चा


पुढील बातमी
इतर बातम्या