पालिका कर्मचाऱ्यांना ५ दिवसांचा आठवडा उशिरा लागू

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना  (state government employees) ५ दिवसांचा आठवडा (5 day week) २९ फेब्रुवारीपासून लागू होणार आहे. मात्र, मुंबई महापालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) कर्मचाऱ्यांना ५ दिवसांचा आठवडा उशीरा लागू होणार आहे. पालिका आयुक्तांच्या मंजुरीनंतर सर्वसाधारण सभेतून मंजुरी मिळाल्यानंतर याचा लाभ पालिका कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. 

५ दिवसांचा आठवडा  (5 day week) लागू करण्याचा शासन आदेश सोमवारी प्राप्त झाला आहे. त्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना  (state government employees) २९ फेब्रुवारीपासून ५ दिवसांचा आठवडा लागू होईल. पालिका कर्मचाऱ्यांना मात्र यासाठी वाट पहावी लागणार आहे. पालिकेची सर्वसाधारण सभा ५ मार्च रोजी होणार आहे.  त्यामुळं पाच दिवसांचा आठवडा लागू करण्यास विलंब होणार आहे. या सभेत मंजुरी मिळाल्यानंतर पालिका कर्मचाऱ्यांना  शनिवार आणि रविवार असे दोन दिवस सुट्टी मिळेल, अशी माहिती एखा अधिकाऱ्यानं दिली. 

मुंबई महापालिकेत आतापर्यंत प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी मिळत आहे. ५ दिवसांचा आठवडा  (5 day week) लागू झाल्यानंतर आठवड्यातून कर्मचाऱ्यांना ५ दिवस काम करावं लागणार आहे. हा बदल झाल्यानंतर त्यांना दररोज ४५ मिनिटे जास्त काम करावं लागणार आहे. मात्र, आरोग्य, सामान्य प्रशासन, अग्निशमन दल, स्वच्छता कर्मचारी आणि शाळांतील कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार नाही. ५ दिवसांचा आठवडा लागू झाल्यावर सर्व शासकीय कार्यालयांच्या कामकाजाची वेळ ४५ मिनिटांनी वाढवण्यात येत असून ती सोमवार ते शुक्रवार सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ अशी राहील. तसंच सर्व शासकीय कार्यालयांतील शिपायांसाठी कामकाजाची वेळ सोमवार ते शुक्रवार सकाळी ९.३० ते सायांकाळी ६.३० अशी राहील.


हेही वाचा -

मालमत्ता कराची २६४४ कोटींची थकबाकी

‘झोपु’तील नियमबाह्य घर विक्रीचे व्यवहार दंड आकारून नियमित


पुढील बातमी
इतर बातम्या