Advertisement

मालमत्ता कराची २६४४ कोटींची थकबाकी

मालमत्ता कर हा मुंबई महापालिकेचा उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे. मात्र, मालमत्ता कराची कोट्यवधी रुपयांची थकबाकी आहे. महापालिकेने या थकबाकीदारांची वॉर्ड निहाय टॉप टेन यादी तयार केली आहे.

मालमत्ता कराची २६४४ कोटींची थकबाकी
SHARES

मालमत्ता कर (Property tax) हा मुंबई महापालिकेचा (Mumbai Municipal Corporation) उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे. मात्र, मालमत्ता कराची कोट्यवधी रुपयांची थकबाकी आहे. कर वसुलीसाठी पालिकेने आता मोहीम हाती घेऊन कठोर कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. महापालिकेने या थकबाकीदारांची वॉर्ड निहाय टॉप टेन यादी तयार केली आहे. २४ पैकी १७ वॉर्डात टॉप टेन थकबाकीदार आहेत. त्यात बड्या बिल्डरांसह वैयक्तिक थकबाकीदारही मोठ्या प्रमाणावर आहेत. या थकबाकीदारांनी तब्बल २६४४ कोटी रुपयांचा कर थकवला आहे. 

सर्व थकबाकीदारांकडे  २८७७ कोटी ६६ लाख ३७ हजार ८११ एवढी थकबाकी होती. त्यापैकी फक्त २३३ कोटी १३ लाख ४३ हजार ७७८ रुपये वसूल झाले आहेत. तब्बल २६४४ कोटी ४८ लाख ९० हजार ३३ रुपये मालमत्ता कराची (Property tax) थकबाकी असल्यामुळे यंदा पालिकेच्या अर्थसंकल्पाला धक्का बसून अनेक विकासकामांना कात्री लागली.

 भांडुप एस वॉर्डात मेसर्स एच. डी. आय. एल. या कंपनीकडे सर्वाधिक थकबाकी आहे. या कंपनीने २१.३२ कोटी रुपयांचा मालमत्ता कर थकवला आहे. याच वॉर्डात नेपच्यून एंटरप्रायझेसकडे १५.८८ कोटी., मे. राजहंस असोसिएट्सकडे ९.९९ कोटी, मे. सुप्रीम हाऊसिंग अँड हॉस्पिटॅलिटी लि.कडे ९.८९ कोटी, मे. सनशाइन हाऊसिंग प्रा. लि.कडे ३.७० कोटींची थकबाकी आहे. ए वॉर्डातील थकबाकीदारांपैकी सर्वांत कमी थकबाकी ८ लाख रु. आहे.

 जी दक्षिण विभागात गॅलेक्सी कॉर्पोरेशन ७.३६ कोटी (एच पूर्व विभाग), ओंकार डेव्हलपर्स १७.०८ कोटी, पी उत्तर विभागात ६.७७ कोटी, जी दक्षिण विभागात रिलायन्स कन्स्ट्रक्शन ४.७६ कोटी, डनलॉप इंडिया २ कोटी ८ लाख, न्यू शिरीन टॉकीज १ कोटी ९५ लाख, लोखंडवाला इन्फ्रास्ट्रक्चर १ कोटी ५६ लाख असे थकबाकीदार आहेत. अनेक सोसायट्यांनीही मोठ्या प्रमाणावर मालमत्ता कर थकवला आहे. एच पूर्व मध्ये सहयोगी सोसायटी ३ कोटी ८३ लाख, श्री. विघ्नेश्वर सोसायटी ६९ लाख., के पश्चिम विभागात प्रस्तावित अण्णा नगर सोसायटी १२ कोटी ४९ लाख, एच पूर्व विभागात परिश्रम एसआरए सोसायटी ९ कोटी ९४ लाख रुपयांचा कर थकवला आहे. 

मालमत्ता कर न भरणाऱ्यांच्या घर आणि कार्यालयांसमोर पालिकेचे कर्मचारी ढोलताशे वाजवत आहेत. याशिवाय मालमत्ता कर न भरणाऱ्या इमारतींचं पाणीही कापण्यात आलं आहे. मालमत्ता कर (Property tax) वसूल करण्यासाठी पालिकेने वॉर्ड स्तरावर हे अभियान सुरू केलं आहे. सोमवारी पालिकने मालमत्ता कर थकविणाऱ्या मेस्को एअरलाईन्सला चांगलाच दणका दिला. कराची थकबाकी वसूल करण्यासाठी या कंपनीची दोन हेलिकॉप्टर्स पालिकेने जप्त केली.


हेही वाचा -

दादरमधील धोकादायक टिळक पुलाची तात्पुरती दुरुस्ती

मुंबईचं कमाल तापमान ३७ अंशांवर
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा