Advertisement

मुंबईचं कमाल तापमान ३७ अंशांवर

मुंबईच्या कमाल तापमानात वाढ होत असून, मुंबापुरीचा पारा दिवसागणिक वाढतच आहे.

मुंबईचं कमाल तापमान ३७ अंशांवर
SHARES

मुंबईतील रहिवशांना उकाडा (HOT) व थंड (COLD) अशा वातावरणाला समोरं जावं लागतं आहे. सकाळी गरम तर रात्री थंड अशा वातारवणामुळं मुंबईकरांना आपल्या आरोग्याची चिंता सतावू लागली आहे. मागील अनेक दिवस मुंबईत असचं वातावरण आहे. मुंबईत सकाळऐवजी दुपारी स्थिर होणाऱ्या वाऱ्यामुळं मुंबईच्या कमाल तापमानात (Maximum Temperature) वाढ होत असून मुंबापुरीचा पारा दिवसागणिक वाढतच आहे.

मुंबईचं कमाल तापमान (Maximum Temperature) मंगळवारी ३७.४ अंश सेल्सिअस एवढं नोंदविण्यात आलं असून, वाढतं तापमान आणि तापदायक सूर्यकिरणांमुळं वातावरण मुंबईकरांना असह्य होऊ लागलं आहे. बुधवारसह गुरुवारीही मुंबईतील आकाश निरभ्र राहणार आहे. कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअसच्या आसपास नोंदविण्यात येणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं (IMD) वर्तविला आहे.

थंडीच्या दिवसात मुंबईचं कमाल तापमान (Maximum Temperature) १७ फेब्रुवारी रोजी ३८.१ अंश नोंदविण्यात आलं. हवामान खात्याच्या नोंदीनुसार या दिवशी राज्यात सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद मुंबईत झाली होती. त्याशिवाय, २५ फेब्रुवारीला देखील राज्यात सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद मुंबईत झाली आहे.

२५ फेब्रुवारी १९६६ रोजी मुंबईचं कमाल तापमान ३९.६ अंश होतं. आतापर्यंतच्या तापमानांपैकी ते सर्वाधिक कमाल तापमान आहे. तर, १७ फेब्रुवारी २०२० ला मुंबईचे कमाल तापमान ३८.१ अंश होते. गेल्या १० वर्षांतील ते सर्वाधिक तिसरं कमाल तापमान आहे.



हेही वाचा -

'त्या' सायकल सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद

मुंबईत पावसाळी कामांच्या तयारीला सुरूवात



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा