Advertisement

'त्या' सायकल सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद

घाटकोपर-वर्सोवा मेट्रो-१ नं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी जागृतीनगर मेट्रो स्थानकाबाहेर भाडेतत्त्वावर सायकल सेवा रविवारपासून उपलब्ध झाली आहे.

'त्या' सायकल सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद
SHARES

घाटकोपर-वर्सोवा मेट्रो-१ नं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी जागृतीनगर मेट्रो स्थानकाबाहेर भाडेतत्त्वावर सायकल सेवा रविवारपासून उपलब्ध झाली आहे. मुंबईतील प्रवाशांची वाढती गर्दी आणि तणावाचा प्रवास यातून सुटका व्हावी यासाठी ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. प्रवासखर्च आणि वाहतूक कोंडीतून दिलासा देणाऱ्या या सेवेला पहिल्या दिवसापासून चांगला प्रतिसाद मिळत आहे. जवळपास १०० प्रवाशांनी मंगळवारी दुपापर्यंत या सेवेचा फायदा घेतल्याची माहिती समोर येत आहे.

या सुविधेचा लाभ घेण्यासाठी सोमवारी ४० जणांनी अ‍ॅप डाऊनलोड करून ५०० रुपये अनामत रक्कम भरली. दिवसभरात २५ प्रवाशांनी सायकली भाड्यानं वापरल्याची माहिती समोर येत आहे. आठवड्याच्या पहिल्या दिवशी ४५ प्रवाशांनी सायकली भाड्यानं घेतल्या, तर मंगळवारी दुपारी ३ वाजेपर्यंत २७ जणांनी सायकल सुविधेचा वापर केला.

या योजनेच्या पहिल्या टप्प्यात एकच मेट्रो स्थानक निवडलं असून, सध्या ५० सायकली उपलब्ध आहेत. एक महिन्यात मेट्रो १ मार्गावरील ११ स्थानकांसाठी देखील ही सेवा सुरू करण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आल्याचं समजतं. सायकल एका ठिकाणाहून घेऊन दुसऱ्या ठिकाणी जमा करण्याची सुविधा उपलब्ध झाल्यास प्रतिसादात आणखी वाढ होणार आहे.

सध्या केवळ एकच स्थानक आणि एकच सायकल स्टॅण्ड असला, तरी प्रवाशांच्या प्रतिसादानुसार इतर स्थानकं आणि काही महत्त्वाच्या ठिकाणी सायकल सुविधा सुरू करण्यात येणार असल्याचं समजतं. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं मेट्रो स्थानकापर्यंतचं आणि स्थानकातून ईप्सित स्थळापर्यंतचं प्रवाशांचे दळणवळण सुकर होण्यासाठी ‘स्टेशन अ‍ॅक्सेस अ‍ॅण्ड मोबिलिटी प्रोग्राम’ (स्टॅम्प) या उपक्रमांतर्गत अनेक स्टार्टअप्स आणि खासगी आस्थापनांना प्रस्ताव पाठवण्याचं आवाहन जुलैच्या अखेरीस केलं होतं.

त्यामध्ये आलेल्या ८० प्रस्तावांपैकी आबरे एआय, ऑल माइल्स आणि माय बाईक या स्टार्टअपच्या प्रस्तावांना नोव्हेंबरमध्ये पथदर्शी योजना म्हणून मान्यता दिली होती. घाटकोपर ते वर्सोवा या मेट्रो १ मार्गावर या योजना राबविण्यात येणार असून, त्यापैकी ‘माय बाईक’ ही सुविधा रविवारी सुरू करण्यात आली आहे. या सायकली जीपीएसने जोडलेल्या असून त्या भाड्यानं घेण्यासाठी ‘माय बाईक’ अ‍ॅपचा वापर करावा लागणार आहे.

दरपत्रक

  • प्रतितास २ रुपये
  • साप्ताहिक पास रु. २८०/-
  • मासिक पास रु. ९००/-
  • दोन महिन्यांच्या पासवर एक महिना मोफत
  • साप्ताहिक आणि मासिक पास घेतल्यास सायकल मुक्कामी घेऊन जाण्याची मुभा.
  • ‘माय बाईक’ या अ‍ॅपच्या वॉलेटमध्ये किमान ५०० रुपये शिल्लक असणे गरजेचे आहे.हेही वाचा -

मुंबईत पावसाळी कामांच्या तयारीला सुरूवात

इंदुरीकर महाराजांना सायबर सेलकडून मोठा दिलासासंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा