Advertisement

मुंबईत पावसाळी कामांच्या तयारीला सुरूवात

यंदाच्या पावसाळ्यातून नागरिकांना या समस्यांमधून सुटका मिळावी यासाठी महापालिकेनं पावसाळी कामांच्या तयारीला सुरूवात केली आहे.

मुंबईत पावसाळी कामांच्या तयारीला सुरूवात
SHARES

मुंबईत दरवर्षी जास्तीचा पाऊस पडल्यास मुंबईची तुंबई होते. त्यामुळं रेल्वे व रस्ते वाहतूक (Railway and road transport) विस्कळीत होते. मागील अनेक वर्षांपासुन मुंबईत पावसाळ्यात पाणी साचण्यासाची (Water logging) परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी महापालिकेकडून बरेच प्रयत्न, सोयीसुविधा करण्यात येतात. मात्र, पावसाळ्यात परिस्थिती जैसे थेच असते. त्यामुळं यंदाच्या पावसाळ्यातून नागरिकांना या समस्यांमधून सुटका मिळावी यासाठी महापालिकेनं पावसाळी कामांच्या तयारीला सुरूवात केली आहे. महापालिकेची (BMC) तयारी पाहता यंदा मुंबईत पाणी साचणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

मान्सूनच्या आगमनाला ३ महिन्यांने शिल्लक राहिले आहेत. त्यामुळं महापालिकेनं पावसाळा पूर्वतयारीचा भाग म्हणून नाले, पर्जन्यजल वाहिन्या व कल्व्हर्ट यांची दुरुस्तीकामं सुरू केली आहेत. अंधेरी, जोगेश्वरी, विलेपार्ले, शिवाजी नगर, गोवंडी, गोरेगाव, कांदिवली बोरिवली, जुहू भागातील नाले, पर्जन्यजल वाहिन्यांची दुरुस्ती करण्यात येणार आहेत. त्यासाठी प्रशासनानं स्थायी समितीच्या मंजुरीसाठी ५ विविध प्रस्ताव आणले असून, या कामांवर १० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

महापालिकेची तयारी

  • जुहू वर्सोवा लिंक रोड कल्व्हर्ट ते एन. दत्ता मार्ग कल्व्हर्टपर्यंतच्या अभिषेक नाल्यावर पॉलिकार्बोनेटचं आच्छादन व मोठ्या नाल्याची सुधारणा केली जाणार आहे.
  • शिवाजी नगर -२ मांगलेवाडी झोपडपट्टी येथील मेघवाडी नाल्याच्या बाजूला तारेचं कुंपण टाकणं या कामांसाठी १ कोटी ४६ लाख रुपयांचं काम देण्यात येणार आहे.
  • कांदिवली पूर्व येथील बिट क्रमांक ३१मध्ये पावसाळ्यात पाणी साचत असल्याने त्यावर तोडगा काढण्यासाठी एकतानगरमधील पी. एम. जी. पी. नाल्याचे रुंदीकरण व पुनर्बांधकाम करण्यात येणार आहे.
  • गोरेगाव पश्चिम येथील अण्णा भाऊ साठे मैदानाजवळील लिंक रोड, गोरेगाव पूर्व येथील अटलांटा टॉवर, आंबेडकर चौकाजवळील शिवनेरी रोड तसंच, गोरेगाव पूर्व येथील जे. पी. रोड, ओम नमः शिवाय इमारतीजवळील कल्व्हर्ट मोडकळीस आल्यानं पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यात अडचण येते व परिसरात पाणी साचते. त्यामुळं ही या तिन्ही ठिकाणी कल्व्हर्टच्या दुरुस्तीसाठी ९४ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.
  • बोरिवली पूर्व येथील काही ठिकाणी या नाल्यांच्या संरक्षक भिंतींचं बांधकाम कोसळलं आहे. त्यामुळं त्याचं बांधकाम होणार असून, त्यासाठी १.६४ कोटी रुपय खर्च येणार आहे.
  • अंधेरी पूर्व प्रभाग क्रमांक ७५मधील कृष्णनगर नाल्यात कचरा जाऊ नये म्हणून ४८ मीटर लांबीचा नाला पॉलिकार्बोनेटनं आच्छादित करण्यात येणार आहे.
  • मिठी नदीपर्यंत पर्जन्य जलवाहिनीचे आरसीसीमध्ये बांधकाम करण्यासाठी २.५० कोटी रुपयांचे काम देण्यात येणार आहे.हेही वाचा -

मुंबईतील डोंगरी परिसरातील अतिक्रमणांवर महापालिकेची कारवाई

प्रवशांसाठी एसी लोकलमध्ये द्वितीय दर्जा ?Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा