Advertisement

प्रवाशांसाठी एसी लोकलमध्ये सेकंड क्लास?

सर्वसामान्यांना एसी लोकल परवडत नसल्यानं त्यांना एसी लोकलचा प्रवास शक्य व्हावा, यासाठी एसी लोकलमध्येही प्रथम आणि द्वितीय वर्ग सुरू करण्याच्या हालचाली मध्य रेल्वेने सुरू केल्या आहेत.

प्रवाशांसाठी एसी लोकलमध्ये सेकंड क्लास?
SHARES

रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुरक्षित व गारेगार व्हावा यासाठी रेल्वे प्रशासनानं (Railway) मध्य व पश्चिम रेल्वे मार्गावर एसी लोकल सुरू केली. सुरक्षित रेल्वे प्रवासासाठी बंद दाराची लोकल असावी, अशी प्रवाशांची मागणी आहे. त्यानुसार, ही एसी लोकल प्रवाशांसाठी सुरू करण्यात आली. मात्र, या एसी लोकलचं (AC Local) तिकीट भाडं अव्वाच्या सव्वा असल्यामुळं एसी लोकलला प्रवाशांचा प्रतिसाद फार कमी मिळतो आहे. तसंच, एसी लोकलमुळं सामान्य लोकलच्या फेऱ्या (Local) रद्द करण्यता आल्यानं प्रवाशांची गैरसोय होते, त्यामुळं रेल्वे प्रशासनावर प्रवासी प्रचंड टीका करत आहेत.

सर्वसामान्यांना एसी लोकल परवडत नसल्यानं त्यांना एसी लोकलचा प्रवास शक्य व्हावा, यासाठी एसी लोकलमध्येही प्रथम आणि द्वितीय वर्ग (Second Class) सुरू करण्याच्या हालचाली मध्य रेल्वेने सुरू केल्या आहेत. एसी लोकलचे प्रवासी वाढवण्यासाठी मध्य रेल्वे (Central Railway) प्रशासनानं तयारी सुरू केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एसी लोकलचं भाडं जास्त असल्यानं या लोकलला अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळं तिकीट भाड्यांत योग्य ते बदल करण्यात यावेत. तसंच, एसी लोकलमध्ये 'प्रथम दर्जा' आणि 'द्वितीय दर्जा' असं वर्गीकरण करण्यात यावं अशी मागणी आता होत असल्याचं समोर आलं आहे.

मुंबई लोकलमधील सुमारे ९० टक्के प्रवासी द्वितीय दर्जानं तर १० टक्के प्रवासी प्रथम दर्जानं प्रवास करतात. एसी लोकलचं तिकीटदर प्रथम दर्जाच्या तुलनेत १.३ ते २.६पट आहेत. त्यामुळं सुमारे ९० टक्के सर्वसामान्य प्रवाशांना एसीचं तिकीटदर परवडत नाही. परिणामी एसी लोकलला प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नाही. प्रवाशांचा प्रतिसाद वाढवण्यासाठी एसी लोकलच्या द्वितीय दर्जाचं भाडं वाढवण्यात यावं. हे तिकीटदर साध्या लोकलच्या द्वितीय दर्जापेक्षा अधिक, मात्र प्रथम दर्जापेक्षा कमी असावं. त्यामुळं द्वितीय दर्जाचे प्रवासी एसी लोकलकडे वळतील.

एसी लोकलमध्ये प्रथम दर्जाचं भाडं कायम ठेवून या प्रवाशांना मोबाइल चार्जिंग, आरामदायी आसन रचना अशा सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी वरिष्ठांकडून करण्यात आल्याचं समजतं. एसी लोकल सर्वसामान्यांना परवडण्यासाठी दिल्ली मेट्रोच्या तिकीटदरांप्रमाणं दर लागू करावे.

त्यानुसार, कमीत कमी १० रुपये आणि जास्तीत जास्त ६० रुपये तिकीट दर ठेवावे. एसी लोकल चालवण्यासाठी अतिरिक्त मार्गिका उपलब्ध नाही. त्यामुळं सामान्य लोकल रद्द करून त्या जागी एसी लोकल चालवाव्या लागत आहे. एसी लोकलचं तिकीट दर सामान्य लोकलपेक्षा अधिक असल्यानं प्रवासी या लोकलनं प्रवास करणं टाळतात.

मध्य रेल्वेवरील ट्रान्स हार्बर मार्गावर ३० जानेवारीला एसी लोकल सुरू झाली. मात्र तिकीटदर जास्त असल्याने पहिल्या फेरीपासूनच या लोकलला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. उलट या लोकलच्या पुढे-मागे धावणाऱ्या लोकलमध्ये गर्दी वाढत असल्याचे दिसून आले.


हेही वाचा -


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा