Advertisement

मुंबईतील डोंगरी परिसरातील अतिक्रमणांवर महापालिकेची कारवाई

उपनगरातील अतिक्रमणांवर लक्ष केंद्रीत केलेल्या मुंबई महापालिकेनं मंगळवारी कारवाईचं अस्त्र दक्षिण मुंबईकडे वळवलं.

मुंबईतील डोंगरी परिसरातील अतिक्रमणांवर महापालिकेची कारवाई
SHARES

मागील दिवसांपासून मुंबईतील अतिक्रमणांवर महापालिकेकडून कारवाई करण्यात येत आहे. चाकरमान्यांना होणारा त्रास व अनधिकृतरित्या अडवलेली जागा याची पडताळणी करत महापालिकेकडून कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून उपनगरातील अतिक्रमणांवर लक्ष केंद्रीत केलेल्या मुंबई महापालिकेनं मंगळवारी कारवाईचं अस्त्र दक्षिण मुंबईकडे वळवलं.

मुंबई महापालिकेनं डोंगरी परिसरातील ४० व्यावसायिक अतिक्रमणां कारवाई करत, ती तोडली. उपायुक्त हर्षद काळे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कारवाईत ४ ट्रक भरेल एवढा माल जप्त करण्यात आला. ही अतिक्रमणे हटवल्यामुळं पादचाऱ्यांना पदपथावरून चालणं सुकर होणार आहे.

मुंबईतील अनेक भागांत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आलं आहे. त्याचप्रमाणं 'बी' विभागातील डोंगरी परिसरात असणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल मार्गालगत व खोजा कब्रस्तानलगत असणारा रस्ता व पदपथांवर प्रामुख्यानं अतिक्रमण झालं होतं. त्यामुळं पादचाऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतं होतं. मात्र, आता कारवाई केल्यानं पादचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.



हेही वाचा -

प्रवशांसाठी एसी लोकलमध्ये द्वितीय दर्जा ?

शिवभोजनथाळीसाठी सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टकडून 5 कोटींचा निधी



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा