Advertisement

इंदुरीकर महाराजांना सायबर सेलकडून मोठा दिलासा

इंदुरीकर महाराज यांनी ओझर येथे केलेल्या किर्तनात वादग्रस्त विधान केले होते. त्या वक्तव्यावर महाराष्ट्र अंधर्शद्धा निर्मूलन समितीने आक्षेप घेत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती

इंदुरीकर महाराजांना सायबर सेलकडून मोठा दिलासा
SHARES

प्रसिद्ध किर्तनकार िनवृत्ती महाराज इंदुरीकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे. इंदुरीकर महाराज यांच्या त्या वादग्रस्त कीर्तनाचा व्हिडीओ यूटयूबवर उपलब्ध नसल्याचा अहवाल महाराष्ट्र सायबर सेलच्या पोलिसांनी दिला आहे. इंदुरीकर महाराज यांच्यावर कीर्तन करताना एक वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप होता. त्यावरुन आरोग्य विभागाने त्यांना नोटीसही पाठवली होती. आपण किर्तनात असे कुठलेही वादग्रस्त वक्तव्य केले नव्हते असे इंदुरीकर महाराज म्हणाले होते. यापुढे इंदुरीकर महाराजांना कुठलीही नवीन नोटीस पाठवण्यात येणार नसल्याची माहिती आहे.


निवृत्ती महाराज इंदुरीकर महाराज यांनी ओझर येथे केलेल्या किर्तनात वादग्रस्त विधान केले होते. त्या वक्तव्यावर महाराष्ट्र अंधर्शद्धा निर्मूलन समितीने आक्षेप घेत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. तशी तक्रार अहमदनगर जिल्हा शल्य चिकित्सकांडे करण्यात आली होती. तक्रारीनंतर आरोग्य विभागाने इंदुरीकर महाराजांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. आरोग्य विभागाने पाठवलेल्या नोटिशीला इंदुरीकर महाराजांनी शेवटच्या दिवशी वकिलांमार्फत उत्तर दिले. मी ते वाक्य बोललोच नाही. मी असं कीर्तन केलंच नाही. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात मी अहमदनगर जिल्हय़ात कीर्तनच केले नाही. मी समाज प्रबोधन करत असल्याने मला महाराष्ट्र शासनाचा महात्मा गांधी पुरस्कार मिळाला आहे. तसेच इतर ठिकाणाहून देखील पुरस्कार मिळाले आहेत. युट्यूबला आम्ही काही टाकत नाही आणि रेकॉर्डिंग देखील करत नाही, असा खुलासा इंदुरीकर महाराजांनी केला होता.


इंदुरीकर महाराजांनी ओझर येथे झालेल्या आपल्या कीर्तनात मुलगा होण्यासाठी आणि मुलगी होण्यासाठी ठराविक दिवशी शरीर संबंध ठेवण्याबाबत वक्तव्य केल्याचा व्हिडीओ समोर आला होता. या व्हिडीओत इंदुरीकर म्हणाले, स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग अशीव वेळी झाला तर होणारी संतती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत घालणारी होते. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर टीका करण्यात आली. त्याचबरोबर त्यांच्या सर्मथनार्थही अनेकजण समोर आले होते. त्यानंतर इंदुरीकर महाराजांनी पत्रक काढून दिलगिरी व्यक्त केली होती.संबंधित विषय
Advertisement