Advertisement

दादरमधील धोकादायक टिळक पुलाची तात्पुरती दुरुस्ती

दादर रेल्वे स्थानक इथं असलेला ब्रिटिशकालीन टिळक पुलाचा धोका पुन्हा एकदा दिसून आला आहे.

दादरमधील धोकादायक टिळक पुलाची तात्पुरती दुरुस्ती
SHARES

मुंबईतील पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) अंधेरी रेल्वेस्थानकातील गोखले पूल (Gokhle Bridge) कोसळण्याच्या दुर्घटनेनंतर रेल्वेमंत्र्यांनी (Railway Minister) सर्वच धोकादायक पुलाचं स्ट्रक्चरल ऑडीट करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार मुंबईतील अनेक धोकादायक पुलांची दुरूस्ती करण्यात येत आहे. अशातच दादर रेल्वे स्थानक इथं असलेला ब्रिटिशकालीन टिळक पुलाचा (Tilak Bridge) धोका पुन्हा एकदा दिसून आला आहे. रविवारी रात्री या पुलावरील पदपथाला तडे गेल्यानं नागरिकांमध्ये घबराट पसरली असून, महापालिकेनं त्या ठिकाणी बॅरिकेड्स (Barricades) उभे करून दुरुस्तीचं काम सुरू केलं आहे.

दादर (Dadar) येथील शंभर वर्षे जुना टिळक पूलही (Tilak Bridge) धोकादायक असल्याने त्याची पुनर्बांधणी केली जाणार आहे. यासाठी निधी मंजूर केला असून लवकरच त्याचं काम सुरू होणार आहे. मात्र रविवारी रात्री या पुलावरील बाजूला असलेल्या पदपथाला तडे गेल्यानं महापालिका आणि रेल्वे प्रशासनानं (Railway) तातडीनं या ठिकाणी बॅरिकेड्स उभे केले आहेत.

महापालिका (BMC) आणि रेल्वे अधिकाऱ्यांनी या पुलाची पाहणी केल्यानंतर यावरील पदपथाच्या उत्तरेकडे असलेल्या टाइल्सला तडे गेल्याचं आढळून आलं. त्यामुळं तुटलेल्या टाइल्स काढून त्या ठिकाणी स्टील प्लेट बसविण्यात येणार आहेत.

टाइल्स काढल्यामुळं या पुलावरील भारही काही प्रमाणात कमी होणार आहे. या दुरुस्तीचं काम पूर्ण होईपर्यंत या पदपथावरुन पादचाऱ्यांना जाण्यास मनाई केली आहे. रेल्वे मार्गावरील ११ महत्त्वाच्या पुलांच्या पुनर्बांधणीसाठी महाराष्ट्र रेल पायाभूत विकास महामंडळाची मदत महापालिका घेणार असून, यामध्ये टिळक पुलाचाही समावेश आहे.



हेही वाचा -

मुंबईत पावसाळी कामांच्या तयारीला सुरूवात

मुंबईचं कमाल तापमान ३७ अंशांवर



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा