कुर्ल्यात इमारतीचे छत कोसळले, ५ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

कुर्ला पश्चिमेतील राम मनोहर लोहिया रोडजवळ म्हाडाच्या बांधकामाधीन इमारतीचं छत कोसळल्यानं एका पाच वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. तर ३ जण जखमी झाले.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी २.४० वाजता ही घटना घडली. मुंबई अग्निशमन दल, पोलीस आणि रुग्णवाहिका यांच्यासह पालिकेच्या एल वॉर्ड इमारत विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

४ जणांना घाटकोपर इथल्या राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं आहे. त्यापैकी एक अफान खान (५) मरण पावल्याचे वृत्त आहे. तर इतर ३ - रफीना शेख (४३), इरफान खान (३३) आणि मोहम्मद जिक्रान (६) यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

“जमिनीचे छत प्लस वन स्ट्रक्चर कोसळले. ३ जखमींना घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, तर ६ वर्षीय मोहम्मद जिक्रान याला भाभा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं आहे,” अशी माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनं दिलं.

जखमींची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे राजावाडी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांनी सांगितलं.


हेही वाचा

मुंबईच्या पोलिस आयुक्त पदी संजय पांडे यांची नियुक्ती

कांजूरमार्गमध्ये एन. जी. रॉयल पार्क कॉम्प्लॅक्सला भीषण आग

पुढील बातमी
इतर बातम्या