Advertisement

मुंबईच्या पोलिस आयुक्त पदी संजय पांडे यांची नियुक्ती

मुंबईच्या पोलिस आयुक्त पदी संजय पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मुंबईच्या पोलिस आयुक्त पदी संजय पांडे यांची नियुक्ती
SHARES

मुंबईच्या पोलिस आयुक्त पदी संजय पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर तर हेमंत नगराळे यांची व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

संजय पांडे यांच्या आधी सध्या मुंबईचे पोलिस आयुक्त असलेले हेमंत नगराळे हे राज्याचे पोलिस महासंचालक होते.

परमबीर सिंह यांना मुंबई पोलिस आयुक्त पदावरुन पायउतार व्हावं लागल्यानंतर त्यांच्या जागी नगराळेंनी मुंबई पोलिस आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर पांडे यांची महाराष्ट्राच्या महासंचालक पदी वर्णी लागली होती.

संजय पांडे यांची पोलीस सेवेतील कारकीर्द

  • आयआयटी कानपूरमधून आयटी कम्प्युटरमध्ये इंजिनीअरिंगचं शिक्षण
  • १९८६ च्या बॅचमधील IPS अधिकारी
  • सर्वात आधी पुण्यात सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून पुणे शहरात कामाला सुरुवात
  • मग मुंबईतील डीसीपी रँकचे अधिकारी बनले
  • १९९२ मुंबई दंगलीदरम्यान धारावीमध्ये दंगल नियंत्रण आणि सामाजिक एकोप्यासाठी पहिल्यांदा मोहल्ला समितीची स्थापना
  • मुंबईत चार हायप्रोफाईल पोलीस स्टेशन मिळून झोन ८ बनवलं, याचे पहिले डीसीपी संजय पांडे बनले. जवळपास तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला
  • १९९३ मध्ये शिवसेना कार्यकर्त्यांच्या दादागिरीला लगाम लावला.
  • १९९५ मध्ये नार्कोटिक्स विभागाचे डीसीपी म्हणून शहरातील ड्रग्ज रॅकेटला आळा घातला
  • १९९७ इकॉनॉमिक ऑफेन्स विंगमध्ये असताना अभ्युदय बँक घोटाळा, चमडा घोटाळ्याचा तपास करुन भ्रष्टाचाराचा उलगडा केला.
  • १९९८ मध्ये पुढील शिक्षणासाठी हॉवर्ड विद्यापीठात गेले, पदव्युत्तर शिक्षण घेतलं.
  • १९९९ मध्ये SPG मध्ये असताना माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या सुरक्षेत तैनात होते
  • २००१ मध्ये राजीनामा दिला, परंतु तो मंजूर केला नाही, प्रकरण कोर्टात गेलं.
  • २००५ मध्ये सेवेत पुन्हा आले आणि कारकीर्दीतील २० वर्षांच्या सेवेनंतर स्वेच्छानिवृत्तीची इच्छा व्यक्त केली, पण ती पूर्ण झाली नाही.
  • कोर्टातील लढ्यानंतर २०११ मध्ये पुन्हे सेवेत रुजू झाले.
  • २०१४-१५ लीगल मॅट्रोलॉजी डिपार्टमेंट कंट्रोलर मेजरमध्ये असताना बिल्डरांकडून फ्लॅट्सच्या कार्पेट एरियातील चोरी उघड केली. लोढा बिल्डरवर कारवाईही केली.
  • २०१५ मध्ये होमगार्डचे अतिरिक्त पोलीस महासंचालक बनले आणि याच पदावर राहून महासंचालकही झाले.
  • अँटिलिया स्फोटक प्रकरणानंतर संजय पांडे यांच्या जागी परमबीर सिंह यांना नियुक्ती दिली. तर संजय पांडे यांना महाराष्ट्र राज्य सुरक्षा परिषदेत पाठवलं.



हेही वाचा

मुंबईत ८ मार्चपर्यंत जमावबंदी, काय सुरू काय बंद?

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा