Advertisement

मुंबईत ८ मार्चपर्यंत जमावबंदी, काय सुरू काय बंद?

बृहन्मुंबई हद्दीत ८ मार्च २०२२ पर्यंत जमावबंदी आदेश जारी केला आहे.

मुंबईत ८ मार्चपर्यंत जमावबंदी, काय सुरू काय बंद?
(Representational Image)
SHARES

बृहन्मुंबई हद्दीत ८ मार्च २०२२ पर्यंत जमावबंदी आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तिंचा जमाव करणे, मोर्चा काढणे, जमाव करून ध्वनीवर्धकाचा, संगितीय बँड, फटाके फोडणे यास प्रतिबंध घालण्यात आला आहे.

विवाह समारंभ आणि विवाहप्रथेशी संबंधित अन्य समारंभ, अत्यंविधी कार्यक्रम, कंपन्या, सहकारी संस्था आणि अन्य संस्था आणि संघटनांच्या वैधानिक बैठका, क्लबमध्ये होणारे कार्यक्रम, सहकारी संस्था तसेच अन्य संस्थांच्या नियमित कामकाजाचा भाग म्हणून होणारे कार्यक्रम यांना या बंदी आदेशातून वगळण्यात आले आहे.

चित्रपटगृहे, नाट्यगृहे तसंच सार्वजनिक मनोरंजनाची अन्य ठिकाणे, न्यायालये, शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये तसंच अन्य शैक्षणिक संस्था, कंपन्या, कारखाने, दुकाने तसेच अन्य आस्थापनांमध्ये नियमित व्यापार, व्यवसाय या कारणांनी होणाऱ्या जमावास यातून वगळण्यात आले आहे.

तसेच जमाव करण्यात तसेच शांततापूर्ण मार्गानं मोर्चास पोलीसांनी परवानगी दिलेली असल्यास त्यासही या जमावबंदीतून वगळण्यात आले आहे, असे बृहन्मुंबई पोलीस उपायुक्त (अभियान) संजय लाटकर यांच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

बृहन्मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत पॅराग्लायडर्स, बलून, पतंग उडविणे, उंच जाणारे फटाके तसंच लेसर प्रकाश (बीम) प्रतिबंध करण्याचे आदेश २० फेब्रुवारी ते २० एप्रिल, २०२२ पर्यंतच्या कालावधीसाठी जारी करण्यात आले आहेत.

बृहन्मुंबई पोलीस उपआयुक्त (अभियान) यांनी हे आदेश जारी केले आहेत. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम १८८ नुसार कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद आहे.



हेही वाचा

केंद्राकडून नव्या अनलॉक गाईडलाईन्स जाहीर

मार्चपासून पालिकेच्या शाळा १००% क्षमतेनं भरण्याची शक्यता

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा