Advertisement

मार्चपासून पालिकेच्या शाळा १००% क्षमतेनं भरण्याची शक्यता

लवकरच या संदर्भातील परिपत्रक काढले जाणार आहे.

मार्चपासून पालिकेच्या शाळा १००% क्षमतेनं भरण्याची शक्यता
SHARES

मार्चपासून मुंबई महापालिका अंतर्गत येणाऱ्या शाळा या पूर्वीच्या वेळेनुसार १०० टक्के विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत भरवण्याचा विचार सुरू आहे. लवकरच या संदर्भातील परिपत्रक काढले जाणार आहे.

मुंबईत डिसेंबरपासून शाळा सुरू जरी झाल्या तर शिक्षण विभागानं ज्या प्रकारे नियमावली ठरवून दिली आहे त्यानुसार शाळा भरवल्या जात आहेत. शाळा या पूर्णवेळ सुरू नसून ३ ते ४ तास शाळा ५० टक्के विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत सुरू आहेत.

मात्र मार्चपासून पूर्वीप्रमाणे पूर्णवेळ शाळा त्यासोबतच १०० टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती आणि इतर उपक्रम शाळांमध्ये सुरू करण्याचा विचार मुंबई महापालिका स्तरावर केला जात आहे. या संदर्भात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी मुंबई महापालिका आयुक्त आणि इतर अधिकाऱ्यांची यासंदर्भात आढावा घेण्यासाठी एक बैठक घेतली आहे.

मुंबई कोरोनाची रुग्ण संख्या कमी होत आहे त्यामुळे निर्बंध सुद्धा शिथील करण्यात आले आहे. शाळा पूर्वीप्रमाणे भरण्याचा विचार केला जात आहे आणि कशा प्रकारचं परिपत्रक सुद्धा मुंबई महापालिकेकडून लवकरच जाहीर केले जाणार आहे. शिवाय अतिरिक्त अभ्यासक्रम-उपक्रम हे शाळांमध्ये घेतले जाणार आहे.

महानगरपालिकेनं (Mumbai BMC) दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत काल ११९ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर २५७ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

नव्यानं आढळलेल्या कोरोना रुग्णांमुळे मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या १ हजार ०८८ इतकी झाली आहे.

आज नव्यानं सापडलेल्या ११९ रुग्णांपैकी २१ रुग्णांनाच रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानं पालिकेकडील ३६ हजार २४९ बेड्सपैकी केवळ ७३९ बेड वापरात आहेत.



हेही वाचा

इयत्ता १ली ते ८वीच्या वार्षिक परीक्षा ऑफलाइन होणार

१२वीच्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल; जाणून घ्या परीक्षा कधी होणार?

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा