Advertisement

कांजूरमार्गमध्ये एन. जी. रॉयल पार्क कॉम्प्लॅक्सला भीषण आग


कांजूरमार्गमध्ये एन. जी. रॉयल पार्क कॉम्प्लॅक्सला भीषण आग
SHARES

कांजूरमार्ग इथं एका इमारतीला भीषण आग लागली आहे. एन. जी. रॉयल पार्क असं या इमाकतीचं नाव आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. 


अग्निशामक दलाच्या १४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. एनजी रॉयल अपार्टमेंट या इमारतीच्या दहाव्या मजल्यावर आग लागली असून बचाव कार्य सुरू आहे.

विक्रोळी कांजूरमार्ग पूर्व येथील एनजी रॉयल पार्कमधील इमारतीच्या ११व्या मजल्यावर ही आग लागली आहे. आग लागल्याची  माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सहा गाड्या, चार जंबो टँकर, दोन अन्य टँकर, रुग्णवाहिका आणि इतर मदत घटनास्थळी पाठवण्यात आली आहे.

इमारतीच्या बी विंगच्या १०व्या आणि ११व्या मजल्यावर ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. 

अग्निशमन दल आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. आज दुपारी सव्वा एक वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली आहे. इमारतीमधील सर्व लोकांना बाहेर काढण्यात आलं आहे. 

या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवीतहानी झाली नसल्याची माहिती मिळत आहे. ही आग लेवल दोनची असून आग लागलेल्या इमारतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. 

आग कशामुळे लागली याचे अद्याप कारण समोर आले नाही. परंतु, ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाच वर्तवण्यात येत आहे.



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा