भांडुपमधील खासगी शाळेतील १६ विद्यार्थ्यांना विषबाधा

गोवंडीतील महापालिकेच्या उर्दू माध्यमातील १०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना औषधातून विषबाधा झाल्याचं प्रकरण ताजं असतानाच, भांडुपमधील एका खासगी शाळेत १६ विद्यार्थ्यांसह एका शिक्षिकेला अन्नातून विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. सध्या त्यांच्यावर मुलुंडमधील अग्रवाल रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कशामुळे विषबाधा?

भांडुप पश्चिमेकडील सह्याद्री विद्यामंदिर या खासगी शाळेत सकाळी ११ च्या सुमारास विद्यार्थ्यांनी जेवण म्हणून डाळ व खिचडी देण्यात आली होती. जेवण झाल्यानंतर जवळपास अर्ध्या तासाने विद्यार्थ्यांना पोटात दुखणं, मळमळ, उलट्या हा त्रास सुरू झाला. त्यानंतर तातडीन या सर्वांना मुलुंडमधील अग्रवाल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं.

दुपारी १२ च्या सुमारास सह्याद्री विद्यामंदिर या शाळेतील विद्यार्थ्यांना पोटात मळमळ व उलट्यांचा त्रास होत असल्याचा आम्हाला फोन आला. त्यानंतर ताबाडतोब १६ विद्यार्थ्यांसह एका शिक्षिकेलाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ही सर्व मुलं १२ वर्ष वयोगटातील असून या सर्वांची प्रकृती स्थिर असून त्यांना सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे.

- डॉ. उशा मोपरेकर, वैद्यकीय अधिकक्ष, अग्रवाल हॉस्पिटल

सह्याद्री विद्यामंदिर शाळेतील विद्यार्थ्यांना डाळ व खिचडी दिल्यानंतर त्यांना त्रास झाल्याची माहिती महापालिकेच्या आपत्कालीन विभागाद्वारे आम्हाला समजली. त्यानंतर तातडीनं अन्न आणि औषध प्रशासना (एफडीए) च्या अधिकाऱ्यांनी शाळेत धाव घेतली असून त्यांनी डाळ व खिचडीचं नमुने ताब्यात घेतले आहेत. हे नमुने तपासल्यानंतर विद्यार्थ्यांना या मुलांना विषबाधा झाली की नाही ही स्पष्ट होईल .

- शैलेश आढाव, सहआयुक्त (बृहन्मुंबई) अन्न, एफडीए


हेही वाचा-

फार्मसिस्ट नसल्यानेच गोवंडीत औषधबाधा?

गोवंडीतील महापालिका शाळेत १९७ विद्यार्थ्यांना विषबाधा, एका विद्यार्थिनीचा मृत्यू

Exclusive: भायखळ्यातील 'त्या' कैद्यांना अन्नबाधा की औषधबाधा?


पुढील बातमी
इतर बातम्या