Advertisement

गोवंडीतील महापालिका शाळेत १९७ विद्यार्थ्यांना विषबाधा, एका विद्यार्थिनीचा मृत्यू

गोवंडीतील संजयनगर परिसरात ही महापालिकेची उर्दू माध्यमाची शाळा आहे. या विद्यार्थ्यांना शासनाच्या कार्यक्रमानुसार दर सोमवारी इ अँड एन फाॅलिक अॅसिड या गोळ्यांचं वाटप केलं जातं. विद्यार्थ्यांमध्ये कॅल्शियम आणि रक्तवाढीसाठी या गोळ्या देण्यात येतात. याच गोळ्या खाल्ल्यामुळेच चांदणीचा मृत्यू झाल्याचं, तर इतर विद्यार्थ्यांना उलट्या आणि छातीत जळजळीचा त्रास होऊ लागल्याचं म्हटलं जात आहे.

गोवंडीतील महापालिका शाळेत १९७ विद्यार्थ्यांना विषबाधा, एका विद्यार्थिनीचा मृत्यू
SHARES

गोवंडीतील महापालिकेच्या उर्दू माध्यमाच्या शाळेत औषधातून विषबाधा झाल्याने एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला असून जवळपास १९७ विद्यार्थ्यांना शुक्रवारी दुपारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मृत विद्यार्थिनीचं नाव चांदणी साहिल शेख (१२) असं आहे. विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांना उपचारासाठी राजावाडी आणि शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.  





कशी घडली घटना?

गोवंडीतील बैंगनवाडी परिसरात संजय नगर महापालिका उर्दू शाळा क्र.२ ही शाळा आहे. या शाळेतील विद्यार्थ्यांना शासनाच्या कार्यक्रमानुसार दर सोमवारी कॅल्शियम आणि रक्तवाढीसाठी आयर्न आणि फाॅलिक अॅसिड या गोळ्यांचं वाटप केलं जातं. त्यानुसार ६ आॅगस्टला विद्यार्थ्यांना या गोळ्या देण्यात आल्या. या गोळ्या खाल्यानंतर दोन दिवसांनी विद्यार्थ्यांना उलट्या, जुलाब आणि छातीत जळजळीचा त्रास होऊ लागला. 



चौकशीची मागणी

त्यानंतर १६१ विद्यार्थ्यांना तपासणीसाठी राजावाडी रुग्णालयात तर, ३६ विद्यार्थ्यांना शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यापैकी शताब्दी रुग्णालयातील २२ विद्यार्थ्यांना तपासणीनंतर घरी सोडण्यात आलं. सहावीत शिकणाऱ्या चांदणीनेही याच गोळ्या खाल्ल्या. त्यानंतर चांदणी मंगळवारी शाळेत गैरहजर होती. बुधवारी आणि गुरूवारी ती शाळेत हजर झाली आणि शुक्रवारी सकाळी तिचा मृत्यू झाला. त्यानंतर तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती महापालिका आरोग्य विभागाच्या कार्यकारी अधिकारी पद्मजा केसकर यांनी दिली. तसंच के.ई.एम. रुग्णालयाचे अधिष्ठाता डाॅ. अविनाश सुपे राजावाडी रुग्णालयात हजर राहून परिस्थितीवर लक्ष ठेवत आहेत.

शाळेत खिचडी खाल्ल्यानंतर ही गोळी देण्यात येते. त्यामुळे विषबाधा नक्की खिचडीमुळे झाली की गोळ्यांमुळे याबाबत संभ्रम आहे. यामुळे गोळ्यांची पाकिटे ताब्यात घेऊन या पाकिटांची उपायुक्तांमार्फत चौकशी करण्याची मागणी सपाचे महापालिका गटनेते रईस शेख यांनी केली आहे.



गोळ्यांचं प्रमाण 'असं'

संजय नगर महापालिका उर्दू शाळेत सकाळच्या सत्रात ६०७ आणि दुपारच्या सत्रात ६३२ असे एकूण १२३९ विद्यार्थी शिकतात. यापैकी पहिली ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना दर सोमवारी आयर्न आणि फाॅलिक अॅसिडची ४५ मिली ग्रॅम वजनाची प्रत्येकी एक गोळी देण्यात येते. तर सहावी ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी १०० मिली ग्रॅमची गोळी देण्यात येते.



हेही वाचा-

आता एफडीएचं लक्ष्य चायनीज गाड्या; पुढच्या आठवड्यापासून विशेष मोहीम

'त्या' महिला कैद्यांना अन्नबाधा नाहीच!



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा