Advertisement

भायखळा जेलच्या ८२ महिला कैद्यांना विषबाधा

भायखळा महिला कारागृहातील ७८ कैद्यांना शुक्रवारी सकाळी जेवणातून विषबाधा झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या महिलांनी उलट्यांचा त्रास होऊ लागल्यानंतर त्यांना उपचारासाठी जे.जे. रुग्णालयात दाखल केलं.

भायखळा जेलच्या ८२ महिला कैद्यांना विषबाधा
SHARES

भायखळा महिला कारागृहातील ८२ कैद्यांना जेवणातून विषबाधा झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान शुक्रवारी सकाळी या महिलांनी उलट्यांचा त्रास होऊ लागल्यानंतर त्यांना उपचारासाठी जे. जे. रुग्णालयात दाखल केलं. सकाळच्या नाश्त्यातून ही विषबाधा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामध्ये दोघींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.


सकाळच्या नाश्त्यातून विषबाधा

भायखळा जेलमधील महिला कैद्यांना शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास नाश्ता देण्यात आला होता. नाश्ता केल्यानंतर काही महिलांना उल्टी, जुलाब आणि पोटात मळमळू लागलं. काही जणींची प्रकृती अधिक खालावल्याने तुरुंग प्रशासनाने त्यांना जे. जे. रुग्णालयात दाखल केलं. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यावेळी उपचार घेण्यासाठी आलेल्या महिलांची संख्या ३८ इतकी होती. मात्र अन्य महिला कैद्यांनाही त्रास जाणवू लागल्याने ही संख्या वाढत गेली. दरम्यान उपचारासाठी या महिलांना जेजेत आणलं असून ही संख्या ८२ वर पोहचली आहे. हा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


सर्वांची प्रकृती स्थिर

उपचारासाठी आलेल्या महिला कैद्यांवर योग्य पद्धतीने उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे. सर्व कैद्यांना प्राथमिक उपचार म्हणून अॅन्टीबायोटीक देण्यात येत असल्याची माहिती जेल प्रशासनाकडून देण्यात आली आहे.


हेही वाचा -

महडमध्ये जेवणातून ८८ जणांना विषबाधा, ३ बालकांचा मृत्यू

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा