Advertisement

महडमध्ये जेवणातून ८८ जणांना विषबाधा, ३ बालकांचा मृत्यू

वस्तुशांतीच्या पुजेतील जेवणातून ८८ जणांना विषबाधा झाल्याची घटना महडमध्ये घडली आहे. हे जेवण केल्यानंतर रात्री उशिरा घरी परतल्यानंतर या सर्वांना अस्वस्थपणा आणि उलट्यांचा त्रास होऊ लागला. यामध्ये विषबाधा झालेल्या कल्याणी शिंगुडे (७), ऋषिकेश शिंदे (१२) प्रगती शिंदे (१३) यांना मृत घोषित करण्यात आलं आहे. तर ७ रुग्ण रायगड येथील जिल्हा रुग्णालयात व्हेंटिलेटरवर आहेत.7

महडमध्ये जेवणातून ८८ जणांना विषबाधा, ३ बालकांचा मृत्यू
SHARES

वास्तूशांतीच्या पूजेतील जेवणातून ८८ जणांना विषबाधा झाल्याचा प्रकार रायगडच्या महडमध्ये समोर आला आहे. यामधील ७ जण रायगड येथील जिल्हा रुग्णालयात व्हेंटिलेटरवर दाखल करण्यात अालं अाहे.  या घटनेत आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते.


3 जणांना मृत्यूचं आमंत्रण

सोमवारी रात्री महड गावतील गावकरी सुभाष माने यांच्या नव्या घरी वास्तुशांतीचा कार्यक्रम होता. यावेळी वस्तुशांतीच्या पुजेनंतर सर्वांसाठी जेवणाचंही आयोजन करण्यात आलं होतं. हे जेवण केल्यानंतर रात्री उशिरा घरी परतल्यानंतर या सर्वांना अस्वस्थपणा आणि उलट्यांचा त्रास होऊ लागला. यामध्ये विषबाधा झालेल्या कल्याणी शिंगुडे (७), ऋषिकेश शिंदे (१२) प्रगती शिंदे (१३) यांना मृत घोषित करण्यात आलं आहे. तर ७ रुग्ण रायगड येथील जिल्हा रुग्णालयात व्हेंटिलेटरवर आहेत.



जेवणात किटकनाशके ....!

या जेवणामध्ये किटकनाशके मिसळल्याची शक्यता एमजीएममधील डॉक्टरांनी वर्तवली आहे. रायगडचे पोलिस उपअधिक्षक पांढरपट्टे यांनी घटनास्थळी भेट देत संपूर्ण जेवणाची शहानिशा केली असता सर्व जेवण खराब झाल्याचं आढळून आलं.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा