Advertisement

फार्मसिस्ट नसल्यानेच गोवंडीत औषधबाधा?

अंगणवाड्या, शाळा, महाविद्यालये आणि सेवाभावी संस्था अशा ज्या ज्या ठिकाणी औषध वाटप केलं जातं त्या प्रत्येक ठिकाणी फार्मसिस्ट आणि डॉक्टर असावेत, त्यांच्याच हाताने औषध दिली जावीत, अशी मागणी फार्मसिस्ट संस्था आणि जनआरोग्य चळवळ करत आहे. पण या मागणीकडे राज्य सरकार साफ कानाडोळा करत आहे.

फार्मसिस्ट नसल्यानेच गोवंडीत औषधबाधा?
SHARES

'औषध जिथे, फार्मसिस्ट तिथे', असं म्हणत गेल्या कित्येक वर्षांपासून औषध उत्पादन ते वितरणापर्यंतच्या प्रक्रियेमध्ये फार्मसिस्ट असणं बंधनकारक करण्याची मागणी होत आहे. त्याचाच भाग म्हणून अंगणवाड्या, शाळा, महाविद्यालये आणि सेवाभावी संस्था अशा ज्या ज्या ठिकाणी औषध वाटप केलं जातं त्या प्रत्येक ठिकाणी फार्मसिस्ट आणि डॉक्टर असावेत, त्यांच्याच हाताने औषध दिली जावीत, अशी मागणी फार्मसिस्ट संस्था आणि जनआरोग्य चळवळ करत आहे. पण या मागणीकडे राज्य सरकार साफ कानाडोळा करत आहे. सरकारच्या याच उदासिनतेमुळे गोवंडी महापालिका शाळेतील विद्यार्थिनीचा बळी गेला असून शेकडो विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतलं आहे.


सरकारतर्फे औषध वाटप

झोपडपट्टी आणि ग्रामीण भागातील मुलांमध्ये कुपोषण मोठ्या प्रमाणात आढळतं. परिणामी शरिरात लोहाची कमी आणि इतर आरोग्य समस्याही त्यांना भेडसावत असतात. त्यामुळे कुपोषण रोखत मुलांचं आरोग्य ठीक रहावं यासाठी आरोग्य विभागाकडून गेल्या काही वर्षांपासून विशेष मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत अंगणवाड्या, जिल्हा परिषद शाळा, महापालिका शाळा आणि इतर सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या औषधाचं वाटप केलं जातं.



नियम धाब्यावर

अंगणवाडी सेविका, आशा वर्कर आणि शिक्षकांना जुजबी प्रशिक्षण देऊन त्यांच्यामार्फत ठिकठिकाणी औषधांचं वाटप केलं जातं. औषध आणि सौंदर्य प्रसाधन कायद्यानुसार औषधाचं वितरण फार्मसिस्ट आणि डॉक्टरांच्या उपस्थितीच होणं बंधनकारक आहे. असं असताना राज्य सरकारच हे सर्व नियम धाब्यावर ठेवत लाखो विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप महाराष्ट्र रजिस्टर्ड फर्मसिस्ट संघटनेचे अध्यक्ष कैलाश तांदळे यांनी केला.

औषध मुदतबाह्य नाहीत ना, कोणती औषध कधी आणि कशी खावीत? या सह अनेक बाबी केवळ डॉक्टर तसंच फार्मसिस्ट यांनाच माहीत असतात. तरीही हे नियम न पाळल्याने गोवंडी सारख्या घटना घडतात, असंही तांदळे यांनी स्पष्ट केलं.



याआधीच्या घटना

याआधीही राज्यभरात औषध वाटपामुळे विषबाधा झल्याच्या घटना घडल्या आहेत. काही वर्षापूर्वी हिंगोलीत जंताची गोळी विद्यार्थ्यांला देताना ती घशात अडकली नि त्या विद्यार्थ्यांचा जीव गेला. या घटनेनंतर आरोग्य विभागाची ही मोहीम वादात अडकली होती. या घटनेनंतरच फार्मसिस्ट आणि डॉक्टरांच्या उपस्थितीत औषध वितरण बंधनकारक करण्याच्या मागणीने जोर धरला. पण अजूनही या मागणीकडे सरकार लक्ष देत नसल्याने जन आरोग्य चळवळ आणि फार्मसिस्ट संघटनानी नाराजी व्यक्त केली.



प्रश्न उपस्थित

गोवंडीतल्या पालक आणि विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार शिक्षकांकडून औषध देण्यात आली, तेव्हा ही औषध मुदतबाह्य होती का, औषधाचा दर्जा चांगला होता का, औषध कधी आणि कशी द्यावीत याची माहिती त्या शिक्षकांना होती का हे आणि असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत. त्यामुळेच फार्मसिस्ट बंधनकारक करण्याची मागणी जोर धरत आहे. तर हे असंच सुरू राहीलं, तर चुकीच्या औषधांमुळे बळी जाण्याच्या घटना घडतच राहतील.



हेही वाचा-

गोवंडीतील महापालिका शाळेत १९७ विद्यार्थ्यांना विषबाधा, एका विद्यार्थिनीचा मृत्यू

आता एफडीएचं लक्ष्य चायनीज गाड्या; पुढच्या आठवड्यापासून विशेष मोहीम



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा